Hide Main content block
मुश्ताक खान, केळशी, रत्नागिरी

शेतकरी आणि मार्केटिंग हे चित्र दिसणं तसं दुर्मिळच, पण आता शेतकरी हळूहळू मार्केटिंगकडं वळू लागलाय. आता उन्हाळा सुरू झालाय त्यामुळं शाळा, कॉलेजना सुट्ट्या लागल्या आहेत आणि कोकणातले समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. हीच संधी कॅश करत कोकणातले शेतकरी पुढं सरसावलेत. रत्नागिरी जिल्ह्यातील केळशी इथल्या अशाच काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन समूह शेतीत कलिंगड आणि स्वीटकॉर्नची (अमेरिकन मका) लागवड केलीय. त्याचं उत्पादन नियोजनाप्रमाणं आता ऐन पर्यटनाच्या मोसमात सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना एरवीपेक्षा चांगला नफा मिळतोय.

राजानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर कुठं जाणार....अशी एक जुनी म्हण आहे. सरकारच्या रुपात नागरीकांना राजाचा मार तर खावाच लागतो, पण आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकाऊन घेतल्यानं कुठं जाऊ...आणि कुणाला सांगु अशी परिस्थिती निर्माण झालीये.
लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून देशात ७ एप्रिलपासून १२ मेपर्यंत एकूण नऊ टप्प्यांत मतदान होणार आहे. महाराष्ट्रात १०, १७ आणि २४ एप्रिल अशा तीन टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभेबरोबर आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीम या तीन राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. मतमोजणी १६ मे रोजी होत असून त्यादिवशी दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. विविध घटकांचा विचार करून नऊ टप्प्यांत मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला असून आजपासूनच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झालीय, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपथ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात गोवंशातील आढळणाऱ्या प्रमुख चार जातींपैकी उत्तर महाराष्ट्रात आढळणारी जात म्हणजे डांगी. घोटीतील जनावरांचा बाजार हा डांगी गाई-बैलांसाठी प्रसिद्ध आहे. पशुधानाचं महत्त्व ठळकपणे समाजासमोर यावं, यासाठी घोटी नगरपालिका आणि 'भारत४इंडिया.कॉम' यांच्या वतीनं या बाजाराचं औचित्य साधून डांगी आणि इतर जनावरांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. इगतपुरीच्या ज्ञानेश्वर कडु यांचा चार वर्षांचा डांगी बैल हा स्पर्धेत चॅम्पियन ठरलाय. त्याला ढाल, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं.
कोकणच्या राजानं आता झिम्मा घालायला सुरवात केलीय. यंदाच्या हंगामातील पहिलाच हापूस थेट देवगडवरुन एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झालाय. दरवर्षीच्या तुलनेत महिनाभर आधीच हापूस बाजारात आलाय. आज तब्बल ३०० पेट्यांची आवक झ़ाली असून ७०० ते १५०० रुपये प्रति किलो दरानं आंबा विकला जातोय. हवामान पोषक राहिल्यानं यंदा चांगल्या दर्जाचा भरघोस हापूस हाताशी लागणार आहे. त्यामुळं किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.  
जगभरातील तरुणाई हातात गुलाबाचं फूल घेऊन 'व्हॅलेंटाइन डे'साठी सज्ज झालीय. पण तुम्हाला माहितेय काय... त्यांच्या हातातल्या बहुतांश गुलाब फुलांना मराठी मातीचा गंध आहे. पुणे, कोल्हापूर, नाशिक येथील गुलाबाच्या मळ्यातून जपान, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, ग्रीस, स्वीडन आणि दुबईच्या बाजारात गुलाब पाठवले गेलेत. यामुळं थोडेथोडके नव्हेत तर सुमारे २० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हाती पडणार आहेत. याशिवाय देशातील मुंबई, दिल्ली, बेंगळूरु, कोलकाता आदी मोठ्या शहरात फुले जातील ती वेगळीच. मग 'रेड रोझ' हातात घेऊन शेतकऱ्यानंही 'हॅपी व्हॅलेंटाइन डे' म्हटलं तर बिघडलं कुठं भाऊ?
thumbnail
नियतीनं त्यांच्या डोळ्यातल्या प्रकाशज्योती कायमच्याच हिरावून घेतलेल्या, आयुष्य अंधःकारमय झालेलं... मात्र अशा अनेकांच्या अंधःकारमय आयुष्यात आशेचा किरण घेऊन आल्या त्या बदलापूरच्या सुहासिनीताई मांजरेकर. अंध मुलांच्या प्रगतीसाठी त्यांनी विशेष अशा 'प्रगती अंध विद्यालया'ची स्थापना करून अनेकांचं आयुष्य सुखमय केलं.
thumbnail
मुंबईत 1 मार्चला बहुभाषिक विद्रोही साहित्य-संस्कृती संमेलन झालं. वडाळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजमध्ये भाषावाद, प्रांतवाद सांस्कृतिकवाद यावर चर्चासत्रं पार पडली. तसंच शाहिरी जलसा ,बहुभाषिक कवी संमेलन चित्र प्रदर्शन लघुपट सादरीकरण आदी कार्यक्रमही झाले.
द्राक्ष म्हटलं की, बागायती पीक असाच आपला समज आहे. परंतु सर्वाधिक द्राक्ष पिकणाऱ्या युरोप खंडात पाण्याशिवाय भरघोस प्रमाणात द्राक्ष घेतली जातात. युरोपातील पाण्याशिवाय द्राक्ष पिकवण्याची ही ट्रिक समजून घेऊन नाशिक जवळच्या लासलगावच्या (ता. निफाड) किशोर होळकर या प्रगतशील शेतकऱ्यानं मोठ्या हिकमतीनं माळरानावर द्राक्ष पिकवली. अत्यल्प पाण्यात सेंद्रीय पद्धतीनं पिकवलेल्या या द्राक्षांची गुणवत्ता जिभेला लगेच जाणवते. मग गुणवत्ता असल्यावर दराला काय तोटा? बाजारपेठेत इतरांपेक्षा त्यांच्या द्राक्षांना जादा भाव मिळतोय. चव हेच आमचं मार्केटिंग, असं ते छातीठोकपणं सांगतात. एवढी त्यांना द्राक्षांच्या गुणवत्तेबद्दल खात्री आहे. आता बोला...!    
पुणे - भारतातील शेतकरी आणि इंडियातील नागरिक यांना जोडणारं नव्या युगाचं, नव्या दमाचं माध्यम,  अशी ओळख बनलेल्या 'भारत4इंडिया.कॉम'चा स्टॉल प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या औत्सुक्याचा विषय झालाय. पहिल्याच दिवशी स्टॉलभोवती शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती.  माध्यमांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसतं.
शेतीप्रधान महाराष्ट्रातील बळीराजाच्या गुराढोरांना पशुधन का म्हणतात, याची प्रचीती जनावरांच्या बाजारात येते. काही हजारांपासून लाखात किमती असलेली दावणीची जनावरं अडीनडीला विकताना शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. तर काही जणांनी पोटापाण्याची वाट याच बाजारातून तयार केलीय. दुष्काळामुळं शेतकऱ्यांवर काय आपत्ती ओढवू शकते, तसंच शेतीमध्ये कितीही यांत्रिकीकरण झालं तरी बैलांना आजही पर्याय नाही, याची प्रचीतीही इथंच येते. घोटीत भरणाऱ्या जनावरांच्या बाजाराचं महत्त्व लक्षात घेऊन 'भारत4इंडिया'नं घेतलेल्या 'टॉप ब्रीड' स्पर्धेत याचं चित्र लख्खपणं समोर आलं.
कृषिप्रधान महाराष्ट्राचं पशुधन हे वैभव असून ते जपण्याचं, तसंच त्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम या अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून होत आहे. जनावरं, त्यांची जात, ब्रीड, यांचं कुठंतरी प्रदर्शन व्हायला पाहिजे. बळीराजाकडून जित्राबांची कशी काळजी घेतली जाते ते समाजापुढं आलं पाहिजे. शेतकऱ्यांना स्फूर्ती मिळावी, त्यांच्या मेहनतीचं फळ मिळावं, यासाठी 'टॉप ब्रीड'सारखे उपक्रम खेडेगावांमध्ये झाले पाहिजेत, अशा शब्दात नाशिकचे तरुण खासदार समीर भुजबळ यांनी 'भारत4इंडिया'च्या 'टॉप ब्रीड' या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं.
दुष्काळावर मात करण्यासाठी नाना प्रयत्न सुरू आहेत. पण या टंचाईवर मात करू शकणारं अफलातून उत्तर शोधलं गेलंय, सोलापुरातल्या अंकोलीच्या माळरानावर. इथं चक्क पाण्याची बँक उभी राहिलीय. या वॉटर बॅंकेचे निर्माते आहेत, प्रा. अरुण देशपांडे नावाचे शेती शास्त्रज्ञ. त्यांच्या या प्रयत्नाची दखल आता सरकारनंही दखल घेतलीय. माळावरच्या या वॉटर बँकेला पर्यटन केंद्राचा दर्जा मिळालाय.
thumbnail
मराठवाड्यासह सोलापूर, सांगली इथं काल अवकाळी पावसानं थैमान घातलं. या पावसात गारांचा खच रस्त्यावर पडला होता. अचानक झालेल्या निसर्गाच्या या अवकृपेनं शेतीचं प्रचंड नुकसान झालं. या पावसाचा व्हिडीओ पाठवलाय विजयकुमार बाबर यांनी.
thumbnail
औरंगाबादमधील विष्णुनगर इथल्या अंगणवाडीतील चिमुकल्यांची सुरुवात होते 'सदा सर्वदा योग तुझा घडावा' या समर्थवाणीनं! सरला देशमुख यांनी पाठवलेला हा व्हिडिओ.
thumbnail
'भारत4इंडिया' या मराठी आणि इंग्लिश वेबपोर्टल वर तुमचं मनापासून स्वागत. 'भारत4इंडिया' हे व्यासपीठ आपल्या देशातलं पहिलं ग्रामीण न्यूज नेटवर्क आहे.
thumbnail
नारळ विमा योजना या विषयी दापोलीचे तालुका कृषी अधिकारी व्ही. एम. कोथिंबिरे यांनी दिलेली माहिती.

images2

घाऊक बाजारातील चालू दरावरून किरकोळ दर काय असायला हवेत, हे इथं आम्ही दिलं आहे.