किसान प्रदर्शन- 2012

'किसान'ची वैशिष्ट्ये

श्रीरंग गायकवाड
सरकारी योजनांची माहिती - 'किसान'मध्ये पहिलंच दालन आहे, महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन विभागाचं. या दालनात सरकार शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवतं, याची माहिती देण्यात येते. पीक उत्पादन, मार्केटिंग आणि निर्यातीबाबत अधिकारी मार्गदर्शन करतात.   


उच्च तंत्रज्ञानाची शेती -
 प्रदर्शनाच्या आवारात मोठ मोठी ग्रीन हॉऊस, पॉली हॉऊस, शेडनेट उभारली गेली आहेत. वातावरण, हवामान (तापमान, आर्द्रता) कसे मेन्टेन ठेवायचं, हंगाम नसतानाही कशी पिकं घ्यायची, याची माहिती 'इंडिया ग्रीन हाऊस'च्या दालनात मिळते.

टिश्यू कल्चर - पाटील बायोटेकच्या स्टॉलवर टिश्यू कल्चरद्वारे तयार झालेला भला मोठा केळीचा घड आणि उंचच उंच वाढलेला ऊस पाहायला मिळतो.  

आधुनिक अवजारं - यंदाच्या प्रदर्शनात आधुनिक शेती औजारं मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतायत. यात पॉवर टिलर, क्रॉप कटर, विविध स्प्रेअर, फॉगर यांचा समावेश आहे.

स्प्रे तंत्रज्ञान - फवारणी कशी केली पाहिजे, फवारताना काय काळजी घ्यायची, फवारण्यासाठी कोणत्या पिकाला कोणता स्प्रेअर आणि नोझल वापरायचा याची सर्वांगीण माहिती या स्टॉलवर मिळते. यातील 'ड्रॅगोन वाईनयार्ड स्प्रेअर' आधुनिक शेतकऱ्याचं लक्ष वेधून घेत आहे. विविध स्प्रे पंपाची माहिती घेण्यासाठी 'ASPPEE'च्या दालनात शेतक-यांनी गर्दी केली होती. 

ट्रॅक्टर – प्रदर्शनात विविध नामवंत कंपन्यांचे आधुनिक ट्रॅक्टर पाहयला मिळतायत. इथं या ट्रॅक्टर्सचं अॅडव्हान्स बुकिंगही करता येतं. आयशर, न्यू हॉलंड, महिन्द्रा, इंटरनॅशनल, फोर्स ट्रॅक्टरची इथं राईडही मारता येते.

मोटर पंप - विविध इलेक्ट्रीक पंपांची आणि सबमर्शीबल पंपाची दालनं प्रदर्शनात पाहायला मिळतायत. 

सिंचन - राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाचं खास दालन प्रदर्शनात उभारण्यात आलंय. जैन इरिगेशन, फिनोलेक्सच्या स्टॉलवर गर्दी. ठिबक-तुषार सिंचनाची माहिती. 

सोलर एनर्जी - प्रदर्शनाची सोलर उत्पादनाची विविध दालनं आहेत. सोलरवर चालणारी बॅटरी, हिटर, लाईट याबाबत शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. त्यामुळं या दालनांमध्ये गर्दी दिसतेय. 

कृषी विद्यापीठांचे स्टॉल – 'किसान'मध्ये कृषी विद्यापीठांनीही स्टॉल लावले आहेत. इथं विद्यापीठांमध्ये होणाऱ्या संशोधनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जात आहे. 

पाणी तपासणी कीट – राज्याच्या पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचाही स्टॉल प्रदर्शनात आहे. पिण्याचं पाणी तपासण्याचं प्रात्यक्षिक इथं शेतकऱ्यांना दाखवण्यात येतं.

बी-बियाणे, खतं, औषधं - नामवंत अशा बी-बियाणे पेस्टिसाईड आणि खंत कंपन्याचे स्टॉल्स प्रदर्शनात आहेत. विविध किटकनाशकं, रोगनाशकं, तणनाशकं, संजीवकांची माहिती शेतकऱ्यांना मिळते.

फ्लोरिकल्चर – 'किसान'मध्ये फुलझांडांचे बियाणे आणि रोपांचे विविध स्टॉल्स आहेत. ऑर्किड, जरबेरा, कार्नेशन, लिलीअम, बर्ड ऑफ पॅराडाईजची फुलं शेतकऱ्याचं तसेच शहरी लोकांचे लक्ष वेधून घेतात.

सीताफळाचा शेक - राज्य सीताफळ महासंघाच्या स्टॉलवर सीताफळाचा मिल्क शेक नाममात्र दरात उपलब्ध आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांना सीताफळ लागवडीचे आणि प्रक्रियेचं इथं मार्गदर्शन केलं जातं.

शेतीच्या फिल्म्स् - प्रदर्शनात खास किसान फिल्म फेस्टिव्हल सुरू झाला आहे. पिक लागवड तंत्रज्ञान, उत्पादन, मार्केटिंग, प्रक्रिया, निर्यात अशी उपयुक्त माहिती इथं  डॉक्युमेंटरीद्वारे दिली जात आहे. हा हॉल शेतकऱ्यांनी तुडुंब भरला आहे. 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.