
वेब पोर्टल नावाचं नवीन युगाचं माध्यम शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतंय याचा आनंदही शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणं दिसत होता.
शेतात पारंपरिक पद्धतीनं राबणारा शेतकरी आता बदलतोय. या बदलाला सामोरं जाण्यासाठी त्याची पुढची पिढी त्याला चांगलाच हातभार लावत असल्यानं त्याचा आत्मविश्वासही वाढल्याचं त्यांच्याशी बोलताना दिसून आलं. त्याला नावीन्याची ओढ असून त्यासाठी तो इंटरनेटसारखी माध्यमं वापरायला उत्सुक आहे. महत्त्वाचं म्हणजे आधुनिक माध्यमांतूनच आपल्याला हवी ती योग्य माहिती मिळेल, याची त्याला खात्री झालीय. त्यामुळंच 'भारत4इंडिया.कॉम'ची तो इत्थंभूत माहिती घेतोय, असंही दिसून आलं.
गावोगावच्या शेतकऱ्यांनी छोटे-मोठे प्रयोग करून उत्पादन वाढवून पैसा कसा मिळवलाय, भविष्याचा वेध घेऊन शेतीत आता काय करायला हवं? सरकारच्या कोणत्या योजना आहेत? त्यांचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रं घेऊन, कुणाला भेटायचं? यांसारखी माहिती या पोर्टलवरून मिळतेय, याचा त्यांना मनस्वी आनंद होत असल्याचंही दिसून आलं.
पहिल्याचं दिवशी शेतकऱ्यांची स्टॉलवर झालेली गर्दी असं बरंच काही सांगून जाते.
Comments (1)
-
Guest (शशि satara)
best