
स्वातंत्र्योत्तर काळातील समतेच्या आंदोलनातील ६ डिसेंबर ७९ चा नामांतर सत्याग्रह हे तेजस्वी पर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर लाखो कार्यकर्ते या आंदोलनात सामील होऊन ठिकठिकाणी तुरूंगात गेले. भटके -विमुक्त , सर्व जाती-जमातीतील दलित, जातीच्या, धर्माच्या पक्षाच्या भिंती भेदून या आंदोलनात सामील झाले. नामांतर आंदोलनाने समतेच्या चळवळीत अपूर्व इतिहास निर्माण केला.
बाबासाहेबांच्या पुतळयाला पुष्पहार घालून आनंदोत्सव साजरा करीत होतो. त्याचवेळी मराठवाडयातून बातमी आली. नामांतर विरोधकांनी प्रतिआंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचे स्वरूप तीव्र होऊ लागले. रेल्वेचे रूळ उद्ध्वस्त झाले. सरकारी कार्यालयांची नासधूस झाली. सगळयात भयंकर म्हणजे दलितांच्या संसाराची राखरांगोळी झाली. मराठवाड्याच्या पायी जिल्ह्यात सैतानाचा हैदोस सुरू झाला. खूनखराबा झाला. लढता लढता पोचीराम कांबळे व जनार्दन मेवाडे हे भीमवीर धारातीर्थी पतन पावले. त्यांच्या लढाईच्या रोमहर्षक कथा आजही डोळयात पाणी उभ्या करतात. सगळयात अधिक नुकसान नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात झाले. आंदोलकांनी कायदा हातात घेतला. बाबांचे फोटो फोडले, मुलांची पुस्तके फाडली. तांब्या पितळेची भांडी चेचली. मनु:स्मृतीचे अधिराज्य सुरू झाले. मराठवाडा पत्राने या काळात आगीत तेल ओतण्याचे कार्य केले.
या सगळया काळात आम्ही जीवाचे रान करून आपद्ग्रस्तांना मदत करीत होतो. पत्थराला पाझर फोडणारे दृश्य होते. घरटी उद्ध्वस्त झाली. सगळे फुकून टाकले. पण सर्वसामान्य जनतेने नामांतराची मागणी सोडली नाही. जिवाच्या निकराने ते म्हणत होते, आमच्या जिवाची – संसाराची राखरांगोळी झाली तरी चालेल पण नामांतराचा निर्णय बदलू नका. ती जिद्द केवळ अतुलनीय अशीच होती.
सरकारी मदत चालू झाली. समतावादी पक्ष, संघटना, व्यक्ती फिरू लागल्या. नामांतर आंदोलनाचे स्वरूप या जळितानंतर व्यापक झाले. ते समतेचे आंदोलन झाले. याच काळातील एक अनुभव सांगण्यासारखा आहे. मी सर्वत्र आपद्ग्रस्तांना भेटी देत होतो. असाच उदगीरला गेलो असताना नळदुर्ग या गावच्या भयंकर हल्ल्याची वार्ता ऐकू न तेथे जाण्यासाठी तयार झालो. नळदुर्गचे विनायक बलाडे यांचे घर सुरूंग लावून पाडण्यात आले होते. मी जायला निघालो आणि माझ्या गाडीपुढे एक माऊली आडवी पडली. उठायला तयार नाही. मी अरुणभाऊंना नवदुर्गला जाऊ देणार नाही. त्यांच्या जीवाला धोका आहे. मी निर्धारपूर्वक सांगितले, आपल्या मंडळीचे संसार उद्ध्वस्त होत असताना, त्यांचे खून पडत असताना मी गप्प बसू शक णार नाही. मला तिथे जाऊन जातीयवाद्यांचा बंदोबस्त करणे भाग आहे. आपल्या मंडळीचे सांत्वन करणे आवश्यक आहे. माऊली हटेना. ती म्हणाली, आपण लाखांचे पोशिंदे आहात. मी आपल्याला जाऊ देणार नाही. तुम्हाला ते ठार मारतील आपण जाऊ नका. माऊ ली ऐकायला तयार नाही. मी माघार घेतली. पोलिस स्टेशनला गेलो. नळदुर्गच्या आंदोलकांनी आम्ही जाण्याच्या मार्गावर दगडांनी भरलेल्या बैलगाडया उभ्या केल्या आहेत. तुम्ही जाताच तुमच्यावर वर्षाव करण्याचा त्यांचा बेत होता. माझ्या डोळयामुढे कृष्णवर्णियांचे चित्र उभे राहिले. लिचिंग दगडाने ठेचून मारण्याची घोर शिक्षा माझा बळी याप्रसंगी जाता तर त्या अज्ञात माऊ लीने माझे प्राण वाचवले. असे प्रेम!
मराठवाड्यातील भीषण अत्याचारानंतर मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलनाचे स्वरू प बदलले. ते समतेचे लोकशाहीचे प्रतीक बनले. समतावादी दलितेतर त्यात मोठया प्रमाणावर सामील झाले. प्रा. म. भि. चिटणीस, डॉ. बाबा आढाव, कॉ. शरद पाटील, अंकुश भालेकर, बाबा दळवी, बापूराव जगताप, अहिल्या रांगणेकर आदींनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाची कक्षा व्यापक केली. मराठवाडयापुरती मराठवाडा विद्यापीठ नामांतर विद्यार्थी-नागरिक कृती समिती याअगोदरच स्थापन झाली होती. आंबेडकरवादी प्राचार्य म. भि. चिटणीस या समितीचे अध्यक्ष होते. त्यांच नेतृत्व लाभल्यामुळे या समितीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते.
एस. एम. जोशी, कॉ. चंद्रगुप्त चौधरी आदी समाजवादी साम्यवादी व डाव्या चळवळीतील नेत्यांनीही आता जनप्रबोधनाला सुरूवात केली होती. नामांतर आंदोलनात मराठवाडयातील दलितांच्या घरादारांची राख झाली. पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे नवी समतावादी विचारांची पिढी उभी राहिली व समतेचे आंदोलन कितीतरी पुढे गेले. अंकुश भालेकर, बापूराव जगताप, फ. मुं. शिंदे, बा. ह. कल्याणकर, जवाहर राठोड आदी समतावादी तरूणांची नवी फौज लढण्यासाठी सिद्ध झाली. आणि मग आम्ही सर्वांनी मिळून ६ डिसेंबर १९७९ ला मराठवाडा विद्यापीठ नामांतर सत्याग्रह जाहीर केला. दलित पँथर, मराठवाडा विद्यापीठ नामांतर विद्यार्थी नागरिक कृ ती समिती, इतर संघटना यांनी सत्याग्रहाची हाक दिली आणि अक्षरश: लाखो लोक औरंगाबादला सत्याग्रहासाठी एकत्र आले. लाखोंना येत असताना वाटेत अटक झाली. औरंगाबाद शहराला युद्धछावणीचे स्वरूप प्राप्त झाले. अटक सत्र जोरात सुरू होते मी वेषांतर करून औरंगाबाद शहरात पोहचलो आणि आंदोलनाचे नेतृत्व केले. भडकल गेट आणि क्रांती चौक माणसांनी फुलून गेला होता. आम्हाला अटक करून हर्सूल जेलमध्ये आणले. जेलचे स्वरूप पालटून गेले. मी तुरूंगाच्या सामील झालो.
स्वातंत्र्योत्तर काळातील समतेच्या आंदोलनातील ६ डिसेंबर ७९ चा नामांतर सत्याग्रह हे तेजस्वी पर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर लाखो कार्यकर्ते या आंदोलनात सामील होऊन ठिक ठिकाणी तुरूंगात गेले. भटके -विमुक्त, सर्व जाती-जमातीतील दलित, जातीच्या, धर्माच्या पक्षाच्या भिंती भेदून या आंदोलनात सामील झाले. नामांतर आंदोलनाने समतेच्या चळवळीत अपूर्व इतिहास निर्माण केला. ‘न भूतो’ असा या चळवळीचे नेतृत्व करण्याचे भाग्य मला लाभले, याबद्दल मी स्वत:ला धन्य समजतो. वस्तुत: नामांतर आंदोलनात सहभागी झालेल्या लाखो कार्यकर्त्यांना, ज्यांची घरेदारे जळाली. जे धारातीर्थी पतन पावले त्या भीमवीरांना ते श्रेय जाते. मी के वळ नेतृत्वाचा निमित्तमात्र धनी झालो. या सत्याग्रहासाठी लाखो वाटांनी येत असताना माझे सहकारी, मित्र रामदास आठवले, बाबा आढाव, मोहन धारीया, जोगेंद्र कवाडे, हुसेन दलवाई यांना वाटेत अटक झाली आणि वेगवेगळया तुरूंगात भरती केले गेले. समुद्राला उधाण आले. दु:खाची बाब म्हणजे या सत्याग्रहात रा. सु गवई, बॅ. खोब्रागडे, प्रकाश आंबेडकर, राजा ढाले, नामदेव ढसाळ, आदी दलित नेते सहभागी झाले नाहीत याचे शल्य कायम राहिलं.
Comments
- No comments found