तुळजापुरात 'जागर पाण्याचा'

तुळजापुरात 'जागर पाण्याचा'

यशवंत यादव
तुळजापूर -  टाटा सामजिक विज्ञान संस्थेच्या (टीस) `स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंट`मध्ये `नॅशनल रुरल युथ फेस्टीव्हल' 25 जानेवारीपासून सुरु होणार असून `युथ एन्ड वॉटर- मेकिंग एव्हरी ड्राप कॉऊंट` ही या फेस्टीव्हलची मुख्य थीम आहे. 27 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या फेस्टीव्हलचा 'भारत4इंडिया' ऑनलाईन मीडिया पार्टनर आहे.

safe imageसध्याचा ज्वलंत विषय असलेल्या पाणी या विषयावर फेस्टीव्हलमध्ये सांगोपांग चर्चा होणार आहे. या फेस्टीव्हलमध्ये देशभरातील तरुण विद्यार्थी, शिक्षक वर्ग, अशासकीय संस्था, शासकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत. पाणी विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ या फेस्टीवलमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी होणार आहेत. याशिवाय विविध खेळांतून, सांस्कृतिक कार्यक्रमांतून इथं जमलेली तरुणाई आपलं टॅलेंट दाखवणार आहे.

दिवसेंदिवस पाण्याची समस्या गंभीर होत चाललीय. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात दुष्काळ पडलाय. युनेस्कोनं तर जगातील 41 टक्के लोक गंभीर पाणी समस्येला तोंड देत असल्याचंही नमुद केलयं. पाण्याची उपलब्धता, वॉटर कॉन्झर्वेशन मॉडेल्स, पाण्याचा काटेकोर वापर, पाण्याचे खासगीकरण, सायन्स क्विझ, पाण्यावरुन राजकारण, पाण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप अशा अनेक विषयावर इथं चर्चा, संवाद, पेपर सादरीकरण होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं.

या फेस्टीव्हल मध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क
स्कुल ऑफ रुरल डेव्हलपमेंट,TISS, तुळजापूर कॅम्पस. मो. नं. 07875272544. Web: www.nryf.co.in


Comments (1)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.