पाणी हेच जीवन....
पाणी हेच जीवन... पाण्याबद्दल युवकांनी योग्य भूमिका घेऊन ती लोकांपर्यंत पोहोचवावी. आता पाण्याबद्दल गंभीरपणं विचार करण्याची गरज आहे.
छतावरील पाण्याचा वापर
रेन वॉटर हार्वेस्टिंग करून छतावरच्या पाण्याचा उपयोग केला पाहिजे. शहरातील लोकांनीही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे.
पाण्याचा पुनर्वापर (वॉटर रिसायकलिंग)
पाण्याचा पुनर्वापर (वॉटर रिसायकलिंग) करण्याबाबतही विचार करावा. असे प्रयोग चेन्नई आणि इंदौर या ठिकाणी यशस्वी झाले आहेत.
ड्रीप सिंचन कंपल्सरी
शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा. पिकांना ड्रीप सिंचन अतिआवश्यक (कंपल्सरी) करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार याबाबत आग्रही आहेत.
पाणी अडवा...पाणी जिरवा...
पाणी अडवून ते जिरवलं पाहिजे, भूगर्भातील पाण्याची पातळी कशी वाढेल याकडं लक्ष देण्याची गरज आहे. यामुळं दुष्काळ हटवण्यासाठी मदत होईल.
70 नद्यांचं पाणी दूषित
सांडपाण्यामुळं महाराष्ट्रातील 70 नद्यांचं पाणी दूषित झालंय. अनेक रोगाचं मूळ हे अशुध्द पाणीच आहे. यामुळं आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला आहे.
ऊस, केळीला पाणी जास्त
भूसार मालाच्या पाचपटीनं केळी आणि उसाला पाणी लागतं. आपण ऊस, केळीसारखी अधिक पाणी लागणारी पिकं घेत गेलो, यामुळं राज्यात 66 अतिउपसा क्षेत्रं निर्माण झाली आहेत.
पाणलोट क्षेत्र विकास
अवेळी पडणारा पाऊस, कमी पर्जन्यमान यामुळं वॉटर टेबल खाली गेलं आहे. शासनाच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा लाभ सर्व गावकऱ्यांनी घ्यावा. पाणी जमिनीत जिरवा, जमिनीची तहान भागल्यानंतर माणसांची तहान आपोआप भागेल.
शेततळ्यांचा फायदा
पाटबंधारे विभागाकडून योग्य कॅचमेंट एरिया निवडून जलसंधारणाचा चांगला कार्यक्रम हाती घेता येईल. शेततळ्यांचा फायदा पुनर्भरणासाठी चांगला होतो.
धरणं बांधा
आता धरण शेतीसाठी राहिली नसून ती पिण्याच्या पाण्याची झाली आहेत. वाढत्या शहरांनी स्वत:च्या मालकीची धरणं बांधून आपली पाण्याची सोय करावी.
Comments
- No comments found