
सरकारचा पाणलोट विकास कार्यक्रम नेहमीप्रमाणं सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 15 तालुक्यांसाठी खास 15 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याअंतर्गत माण तालुक्यात साखळी पध्दतीनं सिमेंट बंधारे बांधण्यात आले. विशेषत: पिंपरी या गावात ही योजना परिणामकारकरित्या राबवण्यात आली.
अधिकाऱ्यांनी विशेष नियोजन करुन वेळेत काम पूर्ण केल्यानं पाऊस पडण्याच्या आधी केवळ एक दिवस आगोदर बंधारा बांधून पूर्ण झाला होता. परिणामी परतीच्या एक-दोन पावसातच या बंधा-यात पाणी साठलं. त्यामुळं परिसरातील 60-70 विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली.
पाण्याअभावी रानात अगदी कुसळगवतही उगवेल की नाही, अशी धाकधूक वाटणारा इथला शेतकरी आता ज्वारी, डाळिंब आदी पिकं घेतोय. बंधाऱ्यात पाणी साठल्यानं या भागातल्या चारा छावण्यांना पाणी पुरवण्याची सुविधाही उपलब्ध झालीय.
अशा प्रकारचे बंधारे बांधण्यासाठी केवळ आठ ते दहा लाख रुपये खर्च येतो. त्यामुळं 'पिंपरी सिमेंट बंधारा प्रकल्प' मॉडेल बनू्न पुढं येतोय.
Comments (1)
-
Guest (शशि satara)
बेस्ट एडिटिंग