नाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013

नाशिकला वाईन फेस्टिव्हल

ब्युरो रिपोर्ट
वाईन झोनमुळं जगाच्या नकाशावर 'भारताची वाईन कॅपिटल' अशी ओळख निर्माण केलेल्या नाशिकमध्ये येत्या 2 आणि 3 मार्चला वाईन फेस्टिव्हल होतोय. हॉटेल ज्युपिटर इथं होणारा हा 'इंडियन ग्रेप हार्वेस्ट वाईन  स्टिव्हल-2013' वाईन शौकिनांसाठी तर पर्वणी असेलच, शिवाय इटली, फ्रान्स आणि स्पेन या देशांच्या धर्तीवर तो होत असल्यानं साहजिकच नाशिकच्या वाईनची आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण होईल. यंदाच्या वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर आहे.

wine2 

अखिल भारतीय द्राक्ष उत्पादक संघ, इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्ड, एमआयडीसी, एमटीडीसी आणि आयटीडीसीतर्फे हा फेस्टिव्हल होतोय. दोन दिवसांमध्ये सोव्हिनो ब्लॉं, शेनिन ब्लॉं, मरलॉट, पिनॉट, शिराज, झिनफिनडल, कॅबरनेट, शार्दोनं या द्राक्षांपासून तयार केलेले नामांकित वाईन उत्पादक कंपन्यांचे ब्रॅण्ड वाईनप्रेमींसाठी उपलब्ध राहणार आहेत. वाईन टेस्टिंग आणि खाद्यपदार्थांबरोबरच वाईन क्वीन-2013 फॅशन शो, वाईन थीमवर Wine Festival 3आधारित नृत्य, संगीत, ग्रेप स्टॅपिंग, शेतकरी मार्केट आणि शेतातील ताजी द्राक्षं, स्पर्धा आणि खरेदीवर आकर्षक डिस्काऊंट ऑफर राहणार आहे. फेस्टिव्हलसाठी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, नागपूर, औरंगाबाद, पुण्यासह देश-विदेशांतील पर्यटक भेट देणार आहेत. कलाकार, अभिनेत्यांनाही आमंत्रित करण्यात आलं आहे. फेस्टिव्हलमध्ये वाईन तज्ज्ञांचं चर्चासत्र, तसंच वाईन तयार करण्याच्या कलेची प्रात्यक्षिकं दाखवली जाणार आहेत.

 

वाईनबाबत अधिक जागृती होण्यासाठी या फेस्टिव्हलच आयोजन करण्यात आलंय. फेस्टिव्हलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, असं इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डाचे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी सांगितलं. भारतीय द्राक्ष उत्पादक संघाला औद्योगिक विकास महामंडळ, पर्यटन विकास महामंडळ, भारतीय पर्यटन विकास महामंडळाचं सहकार्य मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं.


Wine Festival 2अखिल भारतीय वाईन उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजी आहेर, सचिव राजेश जाधव, सदाशिव नाठे, अनिरुद्ध पवार, समीर रहाणे, प्रताप अरोरा, मनोज जगताप आदी उपस्थित होते.

वाईन फेस्टिव्हलमधून..!
-वाईन उत्पादनाची माहिती
-शेतकऱ्यांच्या द्राक्षाला बाजारपेठ मिळेल.
-अॅग्रो-टुरिझमला दिशा देण्याचा प्रयत्न
-वाईनचा नाशिक ब्रॅण्ड विकसित होणार
-नाशिकच्या लाईफस्टाईलवर परिणाम
-वऱ्हाड, खानदेश, कोकण फूड उपलब्ध होणार


नाशिकमध्ये वाईनसाठी 210 कोटींची गुंतवणूक
केंद्र सरकारच्या उद्योग समूह विकास योजनेंतर्गत नाशिकमध्ये `वाईन क्लस्टर' स्थापन करण्यात आला आहे. त्यात ३८ वाईन उत्पादक सहभागी झालेत. त्यापैकी ३३ उत्पादकांचा व्यापार चांगला सुरू आहे, तर पाच उत्पादक आपला व्यापार सुरू करण्याचा प्रयत्न करत आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात सुमारे १४४.६७ लाख लिटर वाईन उत्पादनाची क्षमता आहे. या उद्योगात आतापर्यंत सुमारे २१० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. वाईनच्या व्यापारामुळं जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध झाला आहे.`क्लस्टर' स्थापन केल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक मोबाईल क्रशिंग युनिट, टेस्टिंग लॅब, कोल्ड स्टोरेज, पॅकिंग मशीन, प्रदर्शन केंद्रं आदी सुविधा देण्यात येत आहेत.

 

राज्यात 36 वाईनरीज
आजघडीला देशभरात सुमारे ३८ वाईनरीज कार्यरत असून, वर्षाला ६.२ दशलक्ष लिटर वाईनचं उत्पादन होतं. केवळ दोन वाईनरीज महाराष्ट्राबाहेर कर्नाटक आणि गोव्यात आहेत. उर्वरित 36 वाईनरीज महाराष्ट्रात असून तिथून तब्बल ५.४ दशलक्ष वाईनचं उत्पादन होतं.

Wine Festival 1नाशिकचे ब्रॅण्ड
त्यातही शाम्पेन इंडेज (सीआय), ग्रोवर वाईनयार्डज् आणि सुला वाईनयार्डज् या दर्जेदार वाईनच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहेत.

 

नारायणगावाजवळ असलेली सीआय ही भारतात फ्रेंच पद्धतीनं बनणारी वाईन आहे. वर्षाला तीन मिलियन बॉटल्स वाईनची निर्मिती करण्याची या वाईनरीची क्षमता आहे. अनेक युरोपीय आणि आशियाई देशांमध्ये येथील वाईनची निर्यात होते. दक्षिण कर्नाटकातील ग्रोवर वाईनयार्ड इथं उत्पादन केली जाणारी वाईनचीही परदेशात निर्यात केली जाते. कंपनीकडील २०० हेक्टर वाईनयार्डवर ३५ प्रकारच्या वाईन द्राक्षांचं उत्पादन केलं जातं. भारताच्या वाईन उद्योगात सहभागी झालेल्या नाशिकच्या सुला वाईननं या उद्योगात आघाडी घेतली आहे. महाराष्ट्रात पुणे-नारायणगाव, नाशिक आणि सांगली-सोलापूर या तीन परिसरात दोन ते तीन वर्षांत सुमारे १५,००० टन वाईन द्राक्षांचं उत्पादन होतं आणि त्यापासून वर्षाला सरासरी ९० लाख लिटर वाईनची निर्मिती होते.

 

प्रमुख बाजारपेठा
मुंबई (३९ टक्के), दिल्ली (२३ टक्के), बंगलोर (९ टक्के) आणि गोवा (९ टक्के) या देशातील चार प्रमुख शहरांमध्ये ८० टक्के वाईन रिचवली जाते. उष्णकटिबंध हवामान असतानाही साठवणुकीची कमतरता आणि वाहतुकीच्या सुविधेचा अभाव हा देशातील वाईन मार्केटिंगमधील सर्वात मोठा अडसर आहे. याशिवाय वाईन पिण्यासाठी प्रोत्साहन आणि काही राज्य वगळता स्थानिक बाजारातील प्रतिकूल नियम यामुळं देशातील वाईन उद्योगाला मर्यादा पडत आहेत. त्यामुळं भारतात वाईन पिण्याचं प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत अत्यंत कमी (दर माणसी ०.०७ लि.) आहे.

 


Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.