पारंपरिक रंगांनी तयार केलेली अनेक पेंटिंग्ज आपण बघतो. पण नाशिकच्या श्रीकांत गोराणकर यांनी चक्क वाईनचा वापर करून पेंटिंग्ज तयार केली आहेत. ही वाईन पेटिंग्ज वाईन फेस्टिव्हलचं खास आकर्षण ठरलीत. नुकत्याच नाशिकमध्ये भरलेल्या दोन दिवसीय वाईन फेस्टिव्हलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता.
गोराणकर यांनी सतत दीड वर्षांपासून प्रयोग करत लाल आणि पिवळ्या रंगाच्या वाईनचा वापर करून ही पेंटिंग्ज तयार केली. त्यासाठी त्यांनी विशिष्ट प्रकारच्या कागदाचा वापर केलाय. तसंच काही प्रमाणात वॉटर कलरचा वापर करून रंगांच्या विविध छटा निर्माण केल्या. आपल्याला हा पेंटिंगचा वारसा वडिलांकडून मिळाल्याचं 'भारत4इंडिया'शी बोलताना गोराणकर म्हणाले.
Comments
- No comments found