नाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013

वाईनची मज्जा 'पाऊच'मध्ये!

रोहिणी गोसावी, नाशिक
आपली शेती आणि शेतीपूरक उद्योग बदलत्या काळाशी जुळवून घेत नाहीत, मार्केटमधल्या ट्रेंड्सची माहिती ठेवत नाही, हा समज खोटा पडेल असा उपक्रम, राज्यातल्या वाईन उत्पादकांनी सुरू केलाय. त्यांनी वाईन आता चक्क छोट्या पाऊचमध्ये उपलब्ध करून दिलीय. त्यामुळं शॅम्पू, तेल, शीतपेयं आदींच्या सोबतच वाईनही पाऊचमध्ये परवडणाऱ्या किमतीत मिळताना दिसेल. यातून वाईनचा प्रसार तर झपाट्याने होईलच, शिवाय द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनाही चांगला फायदा होईल. नाशिकमध्ये पार पडलेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये पुण्याच्या पॉज वाईन्सनं वाईन पाऊचमध्ये सादर केली. या 'पाऊच वाईन'ला उत्तम प्रतिसादही मिळू लागलाय. राज्यातला हा पहिलाच उपक्रम आहे. यंदा झालेल्या या वाईन फेस्टिवलचा 'भारत4इंडिया' मीडिया पार्टनर होता. 
 

 

यावेळचा नाशिककरांचा विकेंड चांगलाच झिंग देणारा ठरला. कारण इंडिया ग्रेप हार्वेस्ट आणि इंडियन ग्रेप प्रोसेसिंग बोर्डनं आयोजित केलेल्या वाईन फेस्टिव्हलमुळं तरुणांसोबत मोठ्यांनाही धुंदी चढली. दोन दिवस चाललेल्या वाईन फेस्टिव्हलमध्ये जवळपास ४० वाईनरीज सहभागी झाल्या. महाराष्ट्राबरोबरच देशभरातूनही काही वाईनरीजनी सहभाग घेतला होता.


WINE FESTIVAL NASHIK 24पाऊच वाईनचं आकर्षण

रॉकिंग अशा या वाईन फेस्टिव्हलचं आकर्षण ठरलं ते पाऊच वाईन. सध्या वाईन ही फक्त मोठ्या आणि काही प्रमाणात छोट्या बाटल्यांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळं काही वेळा त्या बाटल्या एका ठिकाणाहून दुसरीकडं नेणं तसं कठीण असतं. म्हणूनच पाऊचमधून वाईन हा एक अभिनव प्रयोग पुण्याच्या पॉज या वाईनरीनं केलाय. या एका 180 मी.लि. वाईनच्या पाऊचची किंमत आहे केवळ 72 रुपये.नाशिक- वाईन सिटी

मंत्रभूमी ते यंत्रभूमी अशी ओळख निर्माण झालेलं नाशिक शहर आता वाईन सिटी म्हणूनही उभारी घेतंय. ही ओळख निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी नाशिकमध्ये दोन दिवसीय 'वाईन फेस्टिव्हल -2013'चं आयोजन करण्यात आलं होतं. विकेंड असल्यामुळं हा वाईन फेस्टिव्हल नाशिककरांसाठी मेजवानीच ठरला.WINE FESTIVAL NASHIK 6

  

वाईन पेंटिंग्जनं मिळवली दाद
वाईन फेस्टिव्हलचं आणखी खास आकर्षण म्हणजे वाईन पेंटिंग आणि ऑरगॅनिक द्राक्ष. नाशिकच्या श्रीकांत गोराणकर यांनी वाईनचा वापर करून पेंटिंग्ज केलीत. तर लासलगावच्या किशोर होळकर यांनी सेंद्रीय पद्धतीचा वापर करून द्राक्षांची यशस्वी शेती केलीय.

 

देशी-विदेशी पर्यटकांचीही हजेरी
नाशिककरांसह देशी- विदेशी पर्यंटकांनीही या वाईनची मजा घेतली. एकाच छताखाली वाईनप्रेमींना अनेक प्रकारच्या वाईनची मजा लुटता आली. वाईन ज्या द्राक्षांपासून बनते अशी जवळपास २०० प्रकारच्या जातींची द्राक्षही या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.

 

wineफेस्टिव्हलला महिलांचीही उपस्थिती
वाईन म्हटलं की महिला तशा दूरच राहतात. मात्र या वाईन फेस्टिव्हला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. खास महिलांसाठी प्रसिद्ध शेफ राकेश तलवार यांचा 'कुकिंग इन वाईन' असा कुकिंगचा कोर्स इथं उपलब्ध करून देण्यात आला होता. तसंच वाईनप्रेमी आणि तरुणांनी मजा लुटावी यासाठी वाईन क्रशिंगही उपलब्ध करून देण्यात आली होती.

 

वाईन टेस्ट करता करता वाईनप्रेमींना गाण्याचा आणि चीजचाही आस्वाद घेता आला. वेगवेगळ्या प्रकारचं आणि वेगवेगळ्या फ्लेवरचं चीज या फेस्टिव्हलमध्ये ठेवण्यात आलं होतं. शिवाय मनोरंजनासाठी रॉक बँडही होताच. अशा या दोन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये जवळपास सात हजार वाईनप्रेमींनी हजेरी लावली. एकंदरीतच हा वाईन फेस्टिव्हल एकदम रॉकिंग असाच ठरला. 

 

 

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.