वाईन फेस्टिव्हलचं आणखी खास आकर्षण म्हणजे वाईन पेंटिंग आणि ऑरगॅनिक द्राक्ष. नाशिकच्या श्रीकांत गोराणकर यांनी वाईनचा वापर करून पेंटिंग्ज केलीत. तर लासलगावच्या किशोर होळकर यांनी सेंद्रीय पद्धतीचा वापर करून द्राक्षांची यशस्वी शेती केलीय. नाशिककरांसह देशी- विदेशी पर्यंटकांनीही या वाईनची मजा घेतली. एकाच छताखाली वाईनप्रेमींना अनेक प्रकारच्या वाईनची मजा लुटता आली. वाईन ज्या द्राक्षांपासून बनते अशी जवळपास २०० प्रकारच्या जातींची द्राक्षही या प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.
फेस्टिव्हलला महिलांचीही उपस्थिती
वाईन म्हटलं की महिला तशा दूरच राहतात. मात्र या वाईन फेस्टिव्हला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. खास महिलांसाठी प्रसिद्ध शेफ राकेश तलवार यांचा 'कुकिंग इन वाईन' असा कुकिंगचा कोर्स इथं उपलब्ध करून देण्यात आला होता. तसंच वाईनप्रेमी आणि तरुणांनी मजा लुटावी यासाठी वाईन क्रशिंगही उपलब्ध करून देण्यात आली होती.
याच फेस्टिव्हल निमित्त फेस्टिव्हलचे आयोजक राजेश जाधव यांच्यासोबत खास बातचित केलीय आमची करस्पाँडंट रोहिणी गोसावी हिनं.
Comments
- No comments found