मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

Album

घोंगडी बनवण्यासाठी साधारणपणं दोन व्यक्तींना १० ते १२ दिवस लागतात. सर्वात प्रथम मेंढीला स्वच्छ धुतल्यावर तिच्या अंगावरील केस कातरून घेतले जातात. हे केस पिंजून त्यापासून लोकर तयार केली जाते. यातील काळी-पांढरी लोकर वेगळी केली जाते. नंतर चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं, ताणलं जातं. सुताला चांगला पीळ यावा आणि घोंगडी व्यवस्थित विणली जावी म्हणून चिंचोक्यापासून बनवलेली खळ लावली जाते. (रात्रभर भिजवलेले चिंचोके चांगले कुटून घेऊन त्यांच्यापासून खळ बनवली जाते.) घोंगडी विणायला जवळपास दोन ते तीन दिवस लागतात. ही घोंगडी लाकडी हातमागावर विणली जात असल्यामुळं तिची बांधणी अतिशय मजबूत असते आणि ती सहजपणे अनेक वर्षं टिकते.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

अंगावरील केस कातरून घेतले जातायत.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

अंगावरील केस कातरून घेतले जातायत.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

हे केस पिंजून त्यापासून लोकर तयार केली जात आहे.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

चरख्यावर लोकरीपासून सूत कातलं जातं.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

चरख्यावर लोकरीपासून कातलेलं सूत ताणलं जातं.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

चरख्यावर लोकरीपासून कातलेलं सूत ताणलं जातं.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

सुताला चांगला पीळ यावा आणि घोंगडी व्यवस्थित विणली जावी म्हणून चिंचोक्यापासून बनवलेली खळ लावली जाते.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

सुताला चांगला पीळ यावा आणि घोंगडी व्यवस्थित विणली जावी म्हणून चिंचोक्यापासून बनवलेली खळ लावली जाते.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

सुताला चांगला पीळ यावा आणि घोंगडी व्यवस्थित विणली जावी म्हणून चिंचोक्यापासून बनवलेली खळ लावली जाते.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

रात्रभर भिजवलेले चिंचोके चांगले कुटून घेऊन त्यांच्यापासून खळ बनवली जाते.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

ही घोंगडी लाकडी हातमागावर विणली.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

घोंगडी विणायला जवळपास दोन ते तीन दिवस लागतात.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

ही घोंगडी लाकडी हातमागावर विणली जातेय.

मेकिंग ऑफ घोंगडी, जालना जिल्हा

ही घोंगडी लाकडी हातमागावर विणली जात असल्यामुळं तिची बांधणी अतिशय मजबूत असते आणि ती सहजपणे अनेक वर्षं टिकते.


इतर गॅलरी

विदर्भातील गौळाऊ पशुधन

'कास'वरची फुलराणी

बाप्पा गेले गावाला....!

पुढच्या वर्षी लवकर या...

बाप्पांसाठी फुलं...

दादर फुल मार्केट

छटा गणपतीच्या...

खानदेश आणि विदर्भातील पोळा