EasyBlog

This is some blog description about this site

माझी टिवटिव!

ब्लॉगिंग का करावं?

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 1696
  • 0 Comment

या शतकाच्या सुरुवातीच्या सुमारास वेबकडं बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा होता. वेबवरची माहिती ही बोनस म्हणून वापरली जायची. पेपरमध्ये किंवा टीव्हीवर काही आलं तर ते विश्वासार्ह समजलं जायचं आणि त्यामुळं जो वाचक वर्ग या माध्यमांनी निर्माण केला त्याला वेबवरचे लेख हा बोनस असायचा. त्याचबरोबर इंटरनेट हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं नव्हतं आणि महागडंसुद्धा होतं.

लेखक, पत्रकार आणि संपादक यांचाही भर आपली मतं टीव्हीवर किंवा पेपरमध्ये छापून आणण्यामध्ये होता. संपादकाला एखादा लेख जर का आवडला नसेल तर तो साभार परत करण्याऐवजी वेबवर टाकायला लागला. थोडक्यात, लिहिणाराही नाराज होत नाही आणि वेबवर वाचणारे वाचतील नाहीतर राहील पडलेला असा एक समज होता. या संकल्पनेचा पुनर्विचार करायची आता संपादकांवर वेळ आली आहे. आता सोशल मीडियामुळं वेबवरच्या ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतायत.  याशिवाय ते वाचकांना हवं तेव्हा उपलब्ध होत आहेत.  आणि याच कारणामुळं पेपरमध्ये आलेला आजचा लेख जो उद्या जुना होतो आणि मग कोणी तो वाचत नाही, त्यापेक्षा वेबवर आपला लेख टाकायची संकल्पना जन्म घेत आहे.
अर्थात, त्यासाठी वाचकानंही आपली सवय बदलली आहे. दर्जेदार बातमी अथवा लेखांसाठी तो आता नुसत्या पेपर्स किंवा टीव्हीवर अवलंबून नाही. लेखकालासुद्धा आपलं एक वेगळं स्थान करण्याची संधी निर्माण झाली आहे. आता कोणीही कुठेही लिहू शकतो. दर्जेदार लेखनाआधीही वाचक वर्ग होता आणि नंतरही राहील. पण जर का सगळं जण ब्लॉ़ग लिहायला लागलं तर काय होईल? या सगळ्यामधून चांगले लेख शोधायचे कसे? गेल्या काही वर्षांमध्ये ब्लॉग लिहिणाऱ्यांची संख्या कितीतरी पटीनं वाढली आहे. आणि इथंच खरं चाईनिज व्हिस्परप्रमाणं फेसबुक, व्टिटरसारखे सोशल मीडिया काम करतात. आपल्याला आवडलेला लेख शेअर करणं, रिव्टिट करणं यामुळं चांगल्या लेखांना, फोटोंना आता एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. प्रभावशाली आणि ताकदीच्या लेखांना आता कुण्या बड्या शेटजींच्या वर्तमानपत्राची गरज नाही. याचा परिणाम बाहेरच्या देशांमध्ये होऊ लागला आहे. पेड न्यूज कमी झाल्यामुळं आता वर्तमानपत्र चालवणं तसं अवघड बनलं आहे. कारण लोकांना आता चांगल्या मजकुरासाठी जुन्या वर्तमानपत्रांवर उदा. टाईम्स, गार्डियन यावर अवलंबून राहावं लागत नाही. अर्थात, याची जाणीव या वर्तमानपत्रवाल्यांनासुद्धा आहे आणि त्यामुळे तेही आता ऑनलाईन वर्तमानपत्रांवर जास्त भर देत आहेत.
स्मार्ट फोनमधील नवीन तंत्रज्ञान हे तेवढंच प्रभावी ठरणार असल्यानं एक नवीन आयाम या सगळ्या क्षेत्राला मिळणार आहे. म्हणून तुम्हाला वाटतं की, आपण काहीतरी लिहावं. स्वतःचं वेगळंपण जपावं.  आज तुमच्यासाठी ब्लॉगसारखं माध्यम उभं राहिलं आहे. त्याचा भरपूर फायदा करून घेता येईल. अर्थात, तुम्ही ते कसं नीट वापरता आणि त्याचबरोबर ते किती लोकांसमोर ठेवता यावरून त्याच्या यशाचं मोजमाप होणार आहे.
 मीडियानं आता केवळ अॅडव्हर्टाईजवर अवलंबून न राहता इतर काहीतरी करत राहणं गरजेचं होणार आहे, ज्यामुळं त्यांचं अस्तित्व राहील. काळानुसार बदलणं क्रमप्राप्त आहे. तुम्ही बदला नाही तर नष्ट व्हा!

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ. सोशल मीडिया हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय.