EasyBlog

This is some blog description about this site

कडाणपाणी

आपण स्वतःला तपासायला हवं

 • Font size: Larger Smaller
 • Hits: 1582
 • 3 Comments

दिल्लीतल्या बसमध्ये झालेल्या बलात्कारानं देशभर काहूर माजलंय. बलात्कारासारख्या विषयानं समाज पेटून उठतो... गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतो... ही बाब समाज आपली संवेदनशीलता अजूनही टिकवून असल्याचं लक्षण आहे. मग यानिमित्तानं या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी राजकीय संघटना जरी यामध्ये घुसल्या तरी याला आक्षेप घेण्याची गरज नाही. कारण एका अतिशय संवेदनशील प्रश्नासाठी लोकांचा आक्रोश एकवटला जातोय.

पण आपण एवढ्यावरच थांबायचं का? हा खरा प्रश्न आहे. आपण खरंच स्त्रियांच्या सन्मानासाठी प्रामाणिक आहोत का, याचंही उत्तर शोधायला हवं आहे. कारण दिल्लीच्या आंदोलनाच्या निमित्तानं एक चर्चा फेसबुकवर सुरू झालीय. ती म्हणजे जेव्हा कधी दलित स्त्रीवर अत्याचार होतो, तेव्हा अशा प्रकारचं रान खरंच संपूर्ण समजातून उठवलं जात का? यानिमित्तानं अनेक बलात्कारांच्या घटनांचा उल्लेखही या फेसबुकच्या चर्चेत झालाय. भंवरीदेवीच्या बलात्कार प्रकरणी न्यायाधीशांनी निकाल दिला होता त्यावेळी जे विधान केलं होतं, ते अतिशय भयानक होतं, त्यांनी म्हटलं होतं, उच्चजातीचा माणूस दलित स्त्रीवर बलात्कार करणं शक्य नाही. खरं तर ही मानसिकता समाजात मोठ्या प्रमाणात आजही आहे.  दलित स्त्रियांवर जेव्हा बलात्काराची घटना घडते तेव्हा संवेदना बोथट झाल्याप्रमाणं समाजाची प्रतिक्रिया तेवढी ठाम असताना दिसत नाही.

दलित स्त्रीचा अपमान हा संपूर्ण स्त्रियांचा अपमान अशा रीतीनं आपण समाज म्हणून त्याकडं पाहतो का? याचाही विचार करण्याची गरज आहे. शिवाय आता दिल्लीतल्या आंदोलनाबाबत जशी चर्चा सर्व माध्यमांतून होतेय, गुन्हेगारांबाबत जी तिरस्काराची भावना समाजभर जाणवतेय, तीच भावना खैरलांजीमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेवेळी होते का, याचाही विचार करण्याची गरज आहे. त्यावेळी जे गुन्हेगार होते त्यांच्या बाजूनं काही पक्षांचे प्रतिनिधी उभे असल्याचं दिसत होतं. त्याशिवाय गुन्हेगारांच्या मदतीसाठीही अनेक पुढारी जाताना दिसले होते. त्यावेळी संपूर्ण समाजात या गुन्हेगारांच्या विरोधात तिरस्काराची भावना दिसत नव्हती. यावेळी अगदी दलित नेते आणि अनेक संघटना या घटनेचा निषेध करताहेत. त्याचप्रमाणं त्यावेळी इतर संघटना रस्त्यावर उतरताना दिसल्या नव्हत्या.

शिवसेनेच्या एक नेत्या स्त्रियांना आधार देण्यासाठी आपण पुढे असतो, असा नेहमी देखावा करतात. अनेकदा त्या चांगलं कामही करत असतात. पण खैरलांजी प्रकरणातील स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या निमित्तानं एक बाजू घेऊन ठामपणानं उभं राहावं, असं त्यांना वाटलं नव्हतं. पत्रकार म्हणून मी त्यांना यावर काही ठोस आंदोलनात्मक पवित्रा घेणार का, असं जेव्हा विचारलं होतं, त्यावेळी त्यांनी याचं उत्तरही देणं टाळलं होतं.

खैरलांजीच्या निमित्तानं अनेक दलित कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. न्याय मिळत नाही असं जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा रस्त्यावर उतरण्याचा मार्ग स्वीकारायलाही त्यांनी मागंपुढं पाहिलं नव्हतं. त्यावेळी मात्र खुद्द गृहमंत्र्यांनी या आंदोलनात नक्षलवादी घुसले असल्याचं विधान केलं होतं. त्यावर मोठा गहजबही विधिमंडळ अधिवेशनात झाला होता. पण मी त्याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा  सामाजिक भूमिकेतून पाहण्याची गरज असल्याचं मानतो. आता दिल्लीच्या आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. यात एक पोलीस कर्मचारी बळी ठरलाय, पण छुपेपणानंही कुणी आता हे आंदोलन जास्तच होतंय, असं म्हणताना दिसत नाहीय. कारण आता आरोपीही पकडले गेले आहेत. पण खैरलांजी घटनेच्या निमित्तानं जेव्हा आंदोलन झालं होतं, तेव्हा मात्र अनेक जणांनी, यांचं आंदोलन आता खूपच होतंय, असं म्हटलं होतं.

या देशात स्त्रियांना सन्मान देण्यासाठी महात्मा फुलेंपासून अनेकांनी लढा दिलाय. स्त्रियांच्या आणि एकूणच माणसाच्या सन्मानासाठी खास कायद्याचं संरक्षण आपल्या घटनेनं दिलंय. पण समाजात आजही आपण माणसामाणसात भेद करायचं सोडलेलं दिसत नाही.

स्त्रियांवर होणारा अत्याचार मग तो कुठल्याही जातीतल्या, धर्मातल्या स्त्रीवर होणारा असो तो ठेचून काढायलाच हवा. कायद्यात सुधारणा करून आणखी कठोर शिक्षा करण्याचाही विचार करायला हरकत नाही. पण समाज म्हणून जेव्हा आपण तळातल्या गरीब, दलित, आदिवासी स्त्रीवरच्या अत्याचाराच्या विरोधात तेवढ्याच पोटतिडकीनं उठणार आहोत काय? याचाही विचार करण्याची वेळ आलीय. यानिमित्तानं एक किस्सा सांगावासा वाटतो. ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मण माने यांनी तो सांगितला होता. एका पारधी समाजाच्या पालावर पोलिसांनी धाड टाकली होती, यावेळी पारधी समाजाच्या स्त्रीला निर्वस्त्र केलं गेलं होतं. त्यावेळी माने यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत हे प्रकरण नेलं होतं. या एकूणच घटनेतून इथल्या पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची मानसिकता काय आहे हेही दिसतं. या मानसिकतेत बदल करण्यासाठी आपण काही करणार आहोत का नाही, याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेवटच्या माणसाचं दुखणं हे दुखणं आहे हे मानायला हवं, तेव्हा ते कमी करण्यासाठी समाज म्हणून आपण कामाला लागू आणि शेवटच्या माणसाच्या जगण्यात आनंद निर्माण करणं म्हणजे एकूण समाजात आनंद निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग येणं, हेही आलंच. पण त्यासाठी मानसिकता बदलण्याचा विचार आपण करणार काय, हा खरा प्रश्न आहे. अन्यथा मग नेहमीच असं वाटेल की, तुमचं दुखणं ते दुखणं आणि आमचं दुखणं ते नेहमीचंच, असा भाव समाजात वाढेल, त्यातून समाजाचा एकजीवपणा जो जातिव्यवस्थेनं उद्ध्वस्त केला होता, तो नव्या व्यवस्थेतही कायम राहण्याचा धोका आहे.

People in this conversation

Comments (3)

 • प्रिय रणधीर,
  खूप चांगलं लिहिलंयत. कुणी कितीही बोललं तरी आपणा भारतीयांच्या संवेदना या 'जातिगत संवेदना' आहेत, हे वास्तव आहे. कारण तसा इतिहास आहे आणि दुर्दैवानं वर्तमानही तसाच आहे. विद्यार्थ्यांचं आंदोलन हे राजकीय हेतूनं प्रेरित नव्हतं, हे मान्य करूनही त्यामध्ये राजकारण घुसवून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सत्यानाश करण्यात आला, हेही तितकंच खरंय. सध्या केवळ ब्राह्मणांना शिव्या घालून आणि त्यासाठी बहुजनत्वाच्या नावाखाली मागास जाती-जमातींतील लोकांना केवळ वापरून घेण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू आहे. हे सामाजिकदृष्ट्या प्रचंड घातक आहे. आपला शत्रू ब्राह्मण हा नाहीयेच मुळात. बाबासाहेबांचा विरोधही नेहमी ब्राह्मण्यवादाला राहिला की जो आज ब्राह्मण वर्गाव्यतिरिक्त इतर उच्च जातींमधूनच अधिक पोसला जातोय. उच्च जातींमधूनच कशाला, अनुसूचित जाती-जमातींमध्येही त्यांच्यातल्या मागासपणाच्या उतरंडीवरही त्यांच्या-त्यांच्यातला भेदाभेद, उच्च-नीच वाद जोपासला जातोय. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे बहुतांश महिला वर्गालाही (सन्माननीय अपवाद आहेत!) अन्य समाजातील महिलांविषयी आत्मीयता वाटत नाही, हे आणखी विदारक वास्तव आहे. ते स्वीकारण्याची मानसिकता उध्वस्त करण्यासाठी विष्णूला पुन्हा एकदा 'परशु'रामाचा जन्म घ्यावा लागेल आणि त्यातही त्याला यश मिळेलच, याची काही शाश्वतीही नाही. असो!
  लेख मनापासून आवडला. शक्य झाल्यास याच विषयावर मी माझ्या ब्लॉगवरही लिहिलंय. लिंक देतोय. जरूर वाचून प्रतिक्रिया द्या. आणि 'भारत फॉर इंडिया'कडून अशाच विधायक कार्याची अपेक्षा बाळगून थांबतो.
  लिंक- http://priydarshan.blogspot.in/2013/01/blog-post.html

 • Jaibhim Sir,

  After perusal of your blog i found myself that why i didn't asked the same questions. i am sorry to say that i/we forgotten the Khairlanji incident, in fact we have to remember the same till the end of our life. thanks for your thoughts given to us

 • Namaskar Kamble saheb,

  You are a big personality and doing lot of good things for society thru media. I respect your views. I am a normal Indian citizen who is sensitive and feels for every such incident and who is trying to do good as and when can. I hope my views will be taken in good spirits.

  In respect to this agitation on Delhi incident, Why do we need to give any name to an incident/event? Do we really need to ask questions like why?

  You comparing this recent unfortunate incident with Khairlanji and asking questions why now and why not then? But my question to you is why only Khairlanji? Why not to 6 other such incidents happened on the same day the Delhi incident happened? Was Khairlanji most ghastly ever? Isn't it insult to all other such incidents and victims/survivors? Due to this incident I got to know so many such unfortunate incidents. I went over numbers and there are 24000 such incidents in 2011, apart from 99000 known cruelty by husband and family. There are so many kids, girls, women who have gone thru this. If Dalit leaders had taken to roads for Khirlanji incident then why not for all other incidents? There must be thousands of other victims still searching for justice. This applies to all sections of society that work only for their sections and do not take up everyone's case.

  All such incidents are really unfortunate and all the guilty should be punished. Khairlanji was one of those unfortunate incidents. Why do we have to color such incidents or any event for that matter in caste or religion? Why can't we take these incidents as a time to do something for this incident, for all others that are done earlier and for all that may happen in future. Why one community don't give un-conditional support just because long back people didn't support such incident in one corner of the country?

  More than caste or section of society and religion, these incidents show that a group or powerful men treat women as their commodity. Anything that happens in Delhi or any metro is bound to get more eyeballs and ears. Well Delhi is unfortunately called Rape capital now a days. So this agitation was bound to happen big in Delhi. Besides, if you notice students started this and I must say students don't carry any religion and caste flags. Students are always together with the greatest bond of friendship. No NGO, no government, no groups were involved in this agitation to start with and what else you can ask for. Students started it, others joined it. This was one of the most unbiased support I had seen in recent past and that too from the youth of country. Similarly recently sugarcane farmer's agitation happened in Kolhapur, Sangli and other rural areas and not in Mumbai or Vidarbha or UP. Isn't it wrong by saying why so big noise only at Kolhapur and Sangli and not for other farmers across India for other crops when most farmer suicides are in Vidarbha region of Maharashtra?

  Well, I just want to say let's unite and do good for the society as one. We Indians are known for not responding and keeping waiting till fire reaches their home, but when people now are fighting together we now need all energy and each one of us to push for right reforms, corrective actions so that such incidents reduce and guilty gets punished quickly. This time and for that matter in any event we all citizens need to be united as one for the cause and not representing any community or section of society. Like in Chak de movie, don't represent state, say I am representing India when playing for India. :)

  I wish if I could have done something differently in past to make this day better but I am committed today to make future better.

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

1995 पासून पत्रकारितेत. चित्रलेखा, लोकप्रभा, नवशक्ति, अक्षर भारत यांमध्ये लेखन. ई टीव्ही मध्ये राजकीय रिपोर्टिंग. 'झी न्यूज'मध्ये राजकीय प्रतिनिधी म्हणून चार वर्षे काम. लोकसभा, विधानसभा निवडणुका तसंच विधीमंडळ अधिवेशनाचं रिपोर्टिंग. 'आयबीएन लोकमत'मध्ये डेप्युटी न्यूज एडिटर, 'सहारा समय'चे इनपूट एडिटर म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्या `भारत 4इंडिया`मध्ये पॉलिटिकल एडिटर म्हणून कार्यरत.