EasyBlog

This is some blog description about this site

तळागाळातून

चला `आयटी`त शेती करूया!

  • Font size: Larger Smaller
  • Hits: 5249
  • 4 Comments

भारत हा कृषिप्रधान देश आहे. जवळजवळ 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, तर 25 टक्के `जीडीपी` हा शेतीक्षेत्रातून येतो. `ग्लोबलायझेशन` आणि `इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीच्या` या युगात कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड अशी क्षमता आणि संधी आहे. `इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी` हा भारताच्या कृषी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा खांब आहे. यामुळंच नामवंत आय. टी., टेलिकॉम कंपन्या आणि जागतिक वृत्तसंस्थांनाही कृषिक्षेत्राची भुरळ पडत आहे. या आय.टी.च्या युगामध्ये माध्यमामध्येही अनेक मोठे बदल होत आहेत. 

 

कृषी संशोधन-योजना विस्तार-प्रसारामध्ये पारंपरिक माध्यमांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे, जसं वृत्तपत्रं, मासिक, साप्ताहिक, रेडिओ, टी.व्ही. असं असूनही अजूनही कृषी विद्यापीठांचं संशोधन आणि कृषी खात्याच्या महत्त्वाच्या योजना असूनही तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत. हे काम प्रभावीपमं करण्यासाठी शासनाच्याही काही मर्यादा आहेत. कृषी संशोधन आणि योजना तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत रुजवण्याचं काम, नवीन माध्यमं (ICT Tools) अतिशय प्रभावीपणे करू शकतात. 

मल्टीमीडिया, कम्युनिकेशन क्रांती, माहिती तंत्रज्ञान आणि नवीन माध्यमाच्या या युगात शेतीविषयक माहिती, संशोधन, तंत्रज्ञान, इनॉव्हेटिव्ह प्रयोग ग्रासरूट लेव्हलपर्यंत प्रभावीपणं पोहोचवण्यासाठी अजूनही प्रचंड स्कोप आहे. या कामामध्ये नवीन माध्यम वेब चॅनल `भारत4इंडिया` महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

आगामी काळात कृषी विस्तार, आधुनिक कृषी तंत्रज्ञान प्रसारामध्ये व शेतकऱ्यांमध्ये नवीन संशोधन रुजवण्यामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा (आय.टी.) वापर अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळंच शेती आणि ग्रामीण क्षेत्रात नवनवीन माध्यमं जोमानं पुढं येत आहेत. 

नवीन माध्यमामध्ये वेब चॅनल (उदा. भारत4इंडिया.कॉम), वेबसाईट, मोबाईल फोन, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया यांचा समावेश होतो. शेतीविषयक माहिती तसंच नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी न्यू मीडिया हे प्रभावी साधन आहे. आजच्या युगात इन्फॉर्मेशन ही `पॉवर` आहे. यातून शेतकऱ्यांच्या ज्ञानात भर पडून ज्ञानकेंद्रित समाज निर्माण होतो.

मोबाईल फोन हे एक महत्त्वाचं असं नवीन माध्यम (ICT Tool) आहे. सध्या मोबाईल फोनचा `रीच` ग्रामीण भागात फारच वाढला आहे. मोबाईलद्वारे शेतीविषयक माहिती - हवामान अंदाज, पीक सल्ला, बाजारभाव व शासनाच्या योजनांची माहिती स्थानिक भाषेत दिली जाते आहे. या माहितीचा शेतकऱ्यांना रोजचे निर्णय घेण्यासाठी उपयोग होतो. यामुळं शेतमालाच्या उत्पादन आणि मार्केटिंगमधील जोखीम टाळता येते तसंच उत्पन्न वाढण्यासाठी मदत होते. या माहितीचं उपयुक्तता मूल्य (Utility Value) जास्त असल्यानं शेतकऱ्यांचं सबलीकरण होण्यास मदत होते. काही टेलिकॉम कंपन्या शेतीविषयक माहिती स्थानिक भाषेत मोबाईलवर व्हॉइसबेसद्वारेसुध्दा देत आहेत. ही माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवर वेगानं, थोडक्यात व सारांशरूपानं मिळते.

भारतामध्ये काही संस्था, कंपन्या यांनी आय.सी.टी. टूल्स आणि मोबाईल फोनद्वारे शेतीविषयक माहिती देण्याचं सुरू केलं आहे. या प्रत्येकांच्या कण्टेंट आणि स्वरूपामध्ये विविधता आहे.

भारतात सध्या सुरू असलेले `आय.सी.टी. आणि शेती`विषयक नावीन्यपूर्ण प्रकल्प- 

1) भारत4इंडिया.कॉम- वेब चॅनल आणि मोबाईल अॅपद्वारे (व्हीडीओबेस) कृषी क्षेत्रातील घडामोडी, कृषी संस्कृती, संशोधन, यशोगाथा, नवीन प्रयोग, मार्केट तंत्र. शेतकरी आणि ग्राहक यांना जोडणार नवीन माध्यम.

2) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस- M Krishi- शेतकऱ्यांना मोबाईलद्वारे कृषी सल्ला. ग्राफ, Pictureचा वापर. 

3) थॉमसन रॉयटर्स- रॉयटर्स मार्केट लाईट (RML): मोबाईल SMSद्वारे शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती. स्पीड, अॅक्युरसी आणि फ्रीडम फ्रॉम बायस या तत्त्वांचं पालन. या सेवेचा भारतभर स्थानिक भाषेत प्रसार.

4) इफको-एअरटेल- IKCL: मोबाईलद्वारे शेतीविषयक माहिती. व्हॉईस मेसेजद्वारे सेवा. अशिक्षित शेतकऱ्यांनाही फायदा. 

5) आय.आय.टी., मुंबई- अॅग्रोकॉम: वेबसाईटद्वारे शेतीविषयक माहिती. तज्ज्ञांचं मोठं जाळे आणि युवा शेतकरी मोठ्या प्रमाणात जोडला गेलाय.

6) मायक्रोसॉफ्ट- डिजिटल ग्रीन- व्हीडिओ डॉक्युमेंटरीद्वारे इंडिजीनस कृषी ज्ञानाचा प्रसार. शेतकऱ्यांच्या इनॉव्हेटिव्ह प्रयोगाच्या प्रसारावर भर

7) नोकिया- नोकिया लाईफ- मोबाईलवरून शेती, शिक्षण, मंनोरंजनविषयक माहिती. परदेशातही या सेवेचं लॉन्चिंग.

कृषी क्षेत्रात इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा (ICT) म्हणजेच नवीन माध्यमांचा (वेब, डिजिटल, मोबाईल, सोशल) वापर दिवसेंदिवस वाढत आहे. याचा फायदा प्रगतशील युवा शेतकऱ्यांना शेतमालाचं गुणवत्ताक्षम अधिक उत्पादन घेऊन त्यावर प्रक्रिया करून त्याचं प्रभावी मार्केटिंग करण्यासाठी होत आहे. म्हणूच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT) युगातील तळागाळातील आपला शेतकरी खऱ्या अर्थानं `ग्लोबल` (Global+Local) बनत आहे.

People in this conversation

Comments (4)

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.

'भारत4इंडिया'चे अॅग्रीकल्चर एडिटर. गेली आठ वर्षं कृषी पत्रकारिता. शेती आणि माहिती-तंत्रज्ञान हे आवडीचे विषय. खेडोपाड्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या यशोगाथा समाजासमोर आणण्यासाठी कार्यरत.