विदर्भवार

This is some blog description about this site

विदर्भवार

Posted

Posted

 

भाजपला मते मिळणार आहेत ती विकासाच्या आणि गतिमान प्रशासनाच्या मुद्द्यावर. तेव्हा हिंदूराष्ट्रवादी असे हिणवून त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न जनतेला देखील आवडणार नाही. सत्तास्थापनेपासून त्यांना दूर करण्याचा प्रयत्नच त्यांची बहुमताकडे वाटचाल सुकर करील. असे झाले तर मात्र देशासाठी ते मोठे चिंतेचे कारण होईल. तेव्हा या अर्थानेही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयोग देशबिघाडी करणारा ठरेल.

Posted

Posted

वाजपेयी सरकारचा मागे पडलेला राष्ट्रव्यापी नदीजोड प्रकल्प , वेगाचे वेड दर्शविणारा बुलेट ट्रेनचा प्रकल्प आणि १०२ नव्या आधुनिक शहराची निर्मिती करण्याची महत्वाकांक्षी योजना या तीन बाबीमुळे या आर्थिक आराखड्याला भव्यता प्राप्त झाली आहे आणि या तीन योजनाच मनमोहन सरकारच्या आर्थिक धोरणा बाहेरच्या आहेत. असे असले तरी या तिन्ही बाबी प्रचंड खर्चिक असल्याने त्या कागदावरच राहण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे प्रत्यक्षात नरेंद्र मोदींचा आर्थिक आराखडा म्हणजे मनमोहन सरकारची धोरणे पुढे नेण्याचा संकल्पच ठरतो. 

Posted

Posted

दीर्घकाळ सत्ता उपभोगल्याने कॉंग्रेस पक्षाचे  नेते आणि कार्यकर्ते भोगवादी बनले आहेत किंवा भोगासाठीच पक्षात स्थिरावले आहेत. या लोकांना बदलवून त्यांना व्यवस्था बदलण्यासाठी तयार करणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मोदींनी दिलेल्या आव्हानापेक्षा हे आव्हान मोठे आहे आणि ते पेलण्याचा राहुल गांधी प्रयत्न करीत असतील तर राहुल गांधीचे कौतुकच केले पाहिजे.

Posted

Posted

सर्वसामान्य नागरिकापासून ते प्रकांड पंडिता पर्यंत सगळेच एकमुखाने आणि एक स्वराने मनमोहन सरकारचा भ्रष्टाचार १.७६ किंवा १.८६ लाख कोटी अशा मानकात मोजतात ! ही किमया साधली ती मनमोहनसिंग यांच्या मौनाने . बोलण्यापेक्षा मौनात शक्ती असते असा आपल्याकडे समज आहेच , मनमोहनसिंग यांच्या पत्रकार परिषदेने तो दृढच होईल. कारण पंतप्रधानाच्या मौनाने जे समज-गैरसमज दृढ झाले होते ते पत्रकार परिषदेत तासभर बोलूनही तसुभराने कमी झालेले नाहीत.

Posted

Posted

२००२ साली मुस्लीम समुदाया विषयी घृणा दाखवून नरेंद्र मोदी जसे मोठे झाले तसेच समग्र राजकीय वर्गाविषयी घृणा निर्माण करून केजरीवाल मोठे होत आहेत. एखाद्या वर्गाविषयी कमालीची आणि मनापासून घृणा बाळगणारा व्यक्ती तळागाळाच्या लोकांना सोबत घेवून हिटलर बनू शकतो हे इतिहासाने दाखवून दिले आहे. हा इतिहास केजरीवाल यांनी खोटा ठरविला तरच ‘आप’च्या विजयाने नवा इतिहास घडला असे मानता येईल.                

सुधाकर जाधव

सुधाकर जाधव

लेखक मुक्त पत्रकार असून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील  संपूर्ण क्रांती व आणिबाणी विरोधी आंदोलनात तसेच शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रीय होते.