विदर्भवार

This is some blog description about this site

विदर्भवार

Posted

Posted

भ्रष्टाचाराचे कितीही आरोप झाले तरी निवडणुकीवर त्या आरोपापेक्षा आपल्या कल्याणकारी योजनांचा प्रभाव राहील या भ्रमात आणि तोऱ्यात कॉंग्रेस नेतृत्व वावरत राहिले. कॉंग्रेसने स्विकारलेल्या जागतिकीकरणामुळे देशाचे चित्र आणि चरित्र बदलले , पण कॉंग्रेस मात्र बदलली नाही . देशाचा ग्रामीण चेहरा आपल्याच धोरणांनी शहरी होतो आहे, पूर्वीचे दारिद्र्य राहिले नाही हे बदललेले वास्तव लक्षात घेवून कॉंग्रेसने स्वत:त बदल केलेच नाहीत.  जे बदल करीत नाहीत ते संपतात . कॉंग्रेसचेही तेच होत आहे. 

Posted

Posted

घटनेतील ३७० व्या कलमाचा फेरविचार करण्याच्या नरेंद्र मोदी यांच्या मागणीवर फारूक अब्दुल्ला यांनी  मोदी एकदा नाही दहादा पंतप्रधान झाले तरी घटनेतील ३७० वे कलम बदलू शकत नाहीत असे आव्हानात्मक सुरात सांगितले आहे.  फारुख अब्दुल्लांचे विधान तांत्रिक , वैधानिक आणि राजकीयदृष्ट्या अगदी बरोबर आहे.

Posted

Posted

राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी पैसा लागतो आणि तसा पैसा जमा करण्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट व्यवहार होतात हेच तर भारतीय राजकारणाचे बरे न होणारे दुखणे बनले आहे. अण्णा आंदोलनाने आणि या आंदोलनातून निर्माण झालेल्या 'आप' पक्षाने या वास्तवाकडे सतत पाठ फिरविली आणि राजकीय पक्षांना बदनाम केले. पण निवडणुकीच्या राजकारणात पडताच इतर पक्षांप्रमाणेच या नव्या पक्षाला देखील याच दुखण्याने ग्रासले आहे हेच या पार्टी संबंधी बाहेर आलेली चित्रफित दर्शविते .

Posted

Posted

जयप्रकाश आंदोलनात आणि त्यातून निर्माण झालेल्या जनता पक्षात  विविध आणि परस्पर विरोधी विचारधारेचे पक्ष सामील झाले होते . 'आप' मध्ये पक्षा ऐवजी विविध आणि परस्पर विरोधी विचारधारेचे व्यक्ती आणि संघटना सामील होत आहे. जनता पक्षाच्या रुपात उभी राहिलेली पक्षाची मोट टिकली नाही. 'आप' च्या रुपात उभी राहिलेली स्वयंभू व्यक्तींची मोट कशी टिकेल हा 'आप' पुढचा सर्वात मोठा प्रश्न आहे .

सुधाकर जाधव

सुधाकर जाधव

लेखक मुक्त पत्रकार असून जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील  संपूर्ण क्रांती व आणिबाणी विरोधी आंदोलनात तसेच शेतकरी संघटनेच्या आंदोलनात सक्रीय होते.