एल्गार

This is some blog description about this site

एल्गार

Posted

Posted

१ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातल्या वळवा तालुक्यातील वाटेगाव या गावात तुकाराम साठे अर्थात, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. जन्मजात गुन्हेगार म्हणून शिक्का मारलेल्या मातंग (मांग) जातीत ते जन्मले आणि निवडुंगाच्या फडानं वेढलेल्या मांगवाड्यात वाढले. आईवडील दोघंही शेतमजूर होते. धामधुमीचा काळ होता. सततचा दुष्काळ, अनावर भूक, एकामागे एक येणारे साथीचे रोग, सावकरांची दंडेलशाही, जमीनदारांचे जुलूम आणि ब्रिटिश सरकारची क्रूर नीती यांच्या तावडीत गोरगरीब कष्टकरी भरडला जात होता. अशा वातावरणात अण्णा भाऊ वाढत होते. त्यांचं बालपणही त्या वातावरणात भरडलं जात होतं.

उज्ज्वला आवाड

उज्ज्वला आवाड

शिक्षण- M. A.  B.Ed आंबेडकरी चळवळीत २४ वर्षांहून अधिक काळ सक्रिय असलेल्या उज्ज्वला आवाड मुंबईच्या रुपारेल महाविद्य़ालयात मराठीच्या प्राध्यापिका म्हणून काम करतायेत. वाचन आणि कविता करणं हा त्यांचा छंद आहे. आंबेडकरी साहित्य, संविधान यांचा गाढा अभ्यास असलेल्या आवाड मॅडम या विषयांवर भाषणंही देतात. अनेक वृत्तपत्रांमधुन वेगवेगळ्या विषयांवर त्या लिखाण करतात., त्याचबरोबर पुस्तक समीक्षाही करतात.