औद्योगिकदृष्टया भारताची प्रगती व्हावी यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काही धोरणं आखली होती. त्या धोरणान्वये भारतातील सर्वसामान्य माणूस उद्योजक कसा बनेल आणि आपल्या पायांवर उभं राहून तो अधिकाधिक स्वावलंबी कसा होईल याबाबतची कारणमीमांसा केली होती. कालांतरानं भारतात औद्योगिक क्षेत्रात बरीच प्रगती झाली. शहरांबरोबरच ग्रामीण भागातून लहानसहान उद्योग उभे राहू लागले.
मीडियावारी
This is some blog description about this site
मीडियावारी
आजच्या युगात शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात जी काही नवीन परिवर्तनं आली आहेत त्यात दूरशिक्षणाचं महत्त्वाचं आणि सर्वोच्च स्थान आहे. विकसित आणि विकसनशील देशातही दूरशिक्षणाचा प्रसार झाला आहे. ‘सर्वांसाठी शिक्षण आणि शिक्षणासाठी सर्व’ ही संकल्पना दूरशिक्षणामुळे प्रत्यक्षात येत आहे.
मराठी पत्रसृष्टीचे जनक Featured
६ जानेवारी १८३२ हा दिवस मराठी वृत्तपत्रसृष्टीसाठी महत्त्वाचा दिवस होय. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू करून मराठी पत्रकारितेच्या इतिहासात सुवर्णाक्षर लिहिलं.
भारतात वृत्तपत्राची सुरुवात १७८० मध्येच झाली. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी 'बेंगाल गॅझेट' नामक वृत्तपत्र सुरू करून भारतीय वृत्तपत्रसृष्टीचं जनकत्व मिळवलं. तथापि महाराष्ट्रात मराठी वृत्तपत्राची सुरुवात होण्यास १८३२ साल उजाडावं लागलं. ६ जानेवारी १८३२ रोजी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 'दर्पण' हे वृत्तपत्र सुरू केलं आणि या दिवसापासून मराठी वृत्तपत्र सृष्टीत चढत्या क्रमानं वृत्तपत्रांची सुरुवात झाली.

बी. एस. मिरगे
1998 मध्ये नवी दिल्लीच्या इंडियन इन्फर्मेशन सर्व्हिसमधून सुरुवात. एम्प्लॉयमेंट न्यूजच्या प्रकाशन विभागात आठ वर्षं सर्व्हिस. 2007 पासून एमजीएएचव्ही, वर्धा इथं जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध वर्तमानपत्रांत काम केलंय. आजपर्यंत वर्तमानपत्रात अनेक लेख प्रकाशित. याशिवाय ऑल इंडिया रेडिओवरही कार्यक्रम केलेत.