भारत4इंडिया

This is some blog description about this site

भारत4इंडिया

Posted

Posted

माघ महिना संपेपर्यंत म्हणजेच थंडीचा हंगाम असेपर्यंत जत्रा, यात्रांनी ग्रामीण भागाला एक वेगळीच हुशारी आलेली असते.

कडाक्याच्या थंडीमध्ये सकाळची उन्हं अंगावर घेत लोक आपापल्या गावच्या श्रध्दास्थानांना भक्तिभावानं भेटी द्यायला निघालेले असतात.

शहराच्या आश्रयाला आलेले गावकरीसुध्दा याच काळात मग सुट्ट्या टाकून आपल्या गावी जायचे बेत आखतात. यात्रा गावाला फुलवून टाकते. नुकत्याच पुसेगाव, माळेगाव इथल्या यात्रा झाल्या. स्थानिक आदिमाता, खंडोबा आणि ग्रामदेवतांच्या उत्सवाचा हा काळ आहे. अजूनही ग्रामीण लोकजीवन या यात्रांवर बरंचसं अवलंबून आहे. अर्थकारण, बाजारहाट, जात पंचायती आणि गुरांचा बाजार असे समाज व्यवहार याच काळात फॉर्मात चालतात आणि म्हणूनच याच काळात चालायच्या त्या बैलगाडा शर्यती, रेड्यांच्या टकरी, शंकरपटाच्या थरारक शर्यती किंवा हेल्यांच्या सगरी.

Posted

Posted

घोडं का अडलं? भाकरी का करपली? हे प्रश्न महाराष्ट्रातल्या राजकीय आणि सामाजिक सत्ताकारणामध्ये फारच प्रसिद्ध आहेत. वेळोवेळी हे प्रश्न सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी सभा गाजवताना व्यासपीठावरून विचारले आहेत. आपले केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा हा प्रश्न व्यासपीठावरून शेतकऱ्यांच्या मेळाव्यात विचारल्याचं मला स्पष्ट आठवतंय.

Posted

Posted

आपल्यातला प्रत्येक जण शहरी असो वा ग्रामीण भागातला. साधारणतः सातवीपर्यंत शिकलेला असला तरी हा ब्लॉग वाचू शकतो.

त्यानिमित्तानं प्रत्येकाचीच उजळणी होईल; कारण 'दुष्काळाची व्याख्या' तेव्हाच आपल्याला 'गुरुजीं'नी किंवा 'बाईं'नी भूगोलाच्या तासात शिकवली होती. दुष्काळ हा जसा निसर्गनिर्मित आहे, तसा तो मानवनिर्मितसुद्धा आहे, हे आपण विसरू लागलो आहोत. महाराष्ट्राचा भूगोल माहीत असलेला कुणीही नेता असो, अभ्यासक असो,  सल्लागार असो वा सजग पत्रकार... दुष्काळाचं सध्याचं चित्रीकरण माध्यमांतून पाहताना त्यांना दुष्काळ म्हणजे जो 'माध्यमां'तून समोर येतोय तो खरंच तसा आहे का? असा मूलभूत प्रश्न मनात नक्कीच पडत असेल. सध्याचं दुष्काळाचं चित्र कुठून येतंय ते आधी पाहूया.

Posted

Posted

पाऊस संपून काही महिनेच झालेत. कोकणापासून विदर्भापर्यंत नद्यांमधलं पाणी ओसरत आलंय. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पाण्याची बोंब ऐकू येऊ लागलीय.

Posted

Posted

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय. राज्याच्या कारभाराचा अख्खा गाडा नागपूरच्या थंडीत दरवर्षीप्रमाणं येऊन दाखल झालाय. संपूर्ण राज्याचा कारभार नागपूरमधून चालावा, नागपूरला मिळालेला उपराजधानीचा दर्जा यातून केवळ मुंबईकेंद्रित प्रशासकीय निर्णय होऊ नयेत. मागासलेल्या, अतिदुर्गम भागांकरता विकासाची वाट खुली व्हावी, विदर्भातील सामान्य जनतेला सोयीनं नागपूरपर्यंत येता यावं यासाठी हा प्रपंच होता.

मंदार फणसे

मंदार फणसे

'भारत4इंडिया.कॉम' ही मुख्यत्वे संस्थापक संपादक मंदार फणसे यांची संकल्पना. गेली 14 वर्षं ते पत्रकारितेत आहेत. सुरुवातीला 'अल्फा मराठी', त्यानंतर 'झी न्यूज', 'एनडीटीव्ही', 'सीएनएन-आयबीएन,' 'आयबीएन-लोकमत' असा त्यांचा पत्रकारितेचा प्रवास झालाय. सध्या ते 'जय महाराष्ट्र' या 24 तास न्यूज चॅनेलचे संपादक आहेत. झुऑलॉजी, इतिहास आणि एन्थ्रोपॉलॉजी हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत. 'भारत' आणि 'इंडिया'मध्ये असलेली दरी सांधण्यासाठी काय करता येईल, याबाबतचे विचार त्यांच्या मनात बरेच दिवस घोळत होते. त्यातूनच 'भारत4इंडिया.कॉम' या वेबपोर्टलचा जन्म झाला. हे पोर्टल म्हणजे ग्रामीण भारताचं पहिलं न्यूज नेटवर्क आहे. 'भारत' आणि 'इंडिया'तली दरी सांधली गेल्यास देशाचा सामाजिक आणि आर्थिक चेहरामोहरा नक्कीच बदलेल, असा त्यांना ठाम विश्वास आहे. 'ब्रेकिंग न्यूज'च्या पलीकडची दृष्टी ठेवून पाहिलेलं मीडियाचं त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलंय.