इतिस्त्री

This is some blog description about this site

इतिस्त्री

Posted

Posted

धर्म हा मानवी जीवनाच्या धारणेसाठी असतो, पण अनेकदा हाच धर्म माणसाच्या जिवावर उठताना दिसतो. आयर्लंडमध्ये सविता हलप्पनवार या मूळ भारतीय वंशाच्या गरोदर तरुणीचा झालेला मृत्यू केवळ धर्मातील नियमाकडे बोट दाखवण्यात आल्यामुळे ओढवला, हे साऱ्या जगानं पाहिलं. मूळची बेळगावची असलेली सविता दंतवैद्य होती आणि प्रवीण हलपन्नवार याच्यासोबत आयर्लंडमध्ये वास्तव्यास होती.

Posted
Posted

 निवांत डोंगरदऱ्यांमध्ये पसरलेला नागालँडचा प्रदेश सौंदर्याचा अनुभव ओंजळीत टाकत होता. हिरवाईनं नटलेले डोंगर आणि पानाफुलांच्या आगळ्यावेगळ्या रंगांनी सुशोभित झाडंझुडपं... पण या सुंदर अशा दुनियेमागं दडली आहे दुसरी एक दुनिया, जी या सौंदर्यासाठी शाप ठरली आहे. इथल्या वातावरणात एक विखार तिनं रुजवायला सुरुवात केली आहे. डोंगरावरल्या हिरवळीची होरपळ करण्याचा डाव ती खेळते आहे.

नंदिनी आत्मसिद्ध

नंदिनी आत्मसिद्ध

मराठीतील आघाडीच्या लेखिका. विविध सामाजिक विषयांवर विपुल लिखाण. महिला हा यांचा अभ्यासाचा विशेष विषय आहे. विविध व्यासपीठांवरून महिलांविषयीचे प्रश्न या पोटतिडकीनं मांडतात. 'कोरा कागद निळी शाई' या पुस्तकात भारतीय भाषांतील लेखिका, त्यांचं साहित्य आणि त्यांची साहित्य निर्मितीप्रक्रिया यांचा रसास्वादात्मक परिचय करून दिलाय. यामुळं भारतीय स्त्रीच्या जाणिवांचा १०० वर्षांचा पट उलगडतो.