कडाणपाणी

This is some blog description about this site

कडाणपाणी

Posted

Posted

विधिमंडळाच्या अधिवेशनाची सुरुवात झाली ती विरोधकांमधल्या फुटीवरून... सभागृहाबाहेरचा इश्यू, पण वातावरण मात्र तापलं ते विधिमंडळ परिसरातलं... राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांच्यावर सेटलमेंटचे आरोप केले आणि मग त्याला उत्तर मिळणार हे अपेक्षितच होतं. त्याप्रमाणं खडसेंनी त्याला उत्तर दिलंच... अगदी थेट सेटलमेंट केली असती तर कोहिनूर मिल खरेदी केली असती, असा थेट टोलाही लगावला. या आरोप-प्रत्यारोपांनंतर राजकीय समीकरणं बदलली. मनसेचा आमदारांचा गट विधानसभेत वेगळा बसणार हे स्पष्ट झालं. अखेर भाजप-मनसेमध्ये कडवटपणा निर्माण झाला. आता तो कुठल्या थराला जाणार याची चुणूक दिसायला लागलीच आहे. नाशिक महानगरपालिकेत भाजपचा पाठिंबा मनसेला मिळालाय. त्याचा फेरविचार सुरू झाल्याची चर्चाही विधिमंडळ परिसरात सुरू झाली.

Posted

Posted

दिल्लीतल्या बसमध्ये झालेल्या बलात्कारानं देशभर काहूर माजलंय. बलात्कारासारख्या विषयानं समाज पेटून उठतो... गुन्हेगारांना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरतो... ही बाब समाज आपली संवेदनशीलता अजूनही टिकवून असल्याचं लक्षण आहे. मग यानिमित्तानं या आंदोलनाचा फायदा घेण्यासाठी राजकीय संघटना जरी यामध्ये घुसल्या तरी याला आक्षेप घेण्याची गरज नाही. कारण एका अतिशय संवेदनशील प्रश्नासाठी लोकांचा आक्रोश एकवटला जातोय.

Posted

Posted

'कडाण पाणी' हे ब्लागचं नाव घ्यायच्या मागं एक भूमिका आहे...खरं तर सामान्य माणसाच्या वाट्याला नेहमीचं सत्व कमी झालेलं किंवा जे खरं सत्वं आहे... त्याच्यातला अर्क आहे तो वाट्याला येत नाही.. मग आपला वाटा मिळण्याचं असो...किंवा कष्ट करून त्याचा मोबदला मिळण्याची वेळ असो.. ऐनवेळी सत्व दुस-याच्याच वाट्याला जातं.. ग्रामीण भागात देवाला बोकड कापण्याची परंपरा आहे. बोकड कापल्यानंतर रात्री सगळ्या गावाला जेवायला बोलावलं जातं. एक बोकड आणि मोठं तपेलंभर रस्सा जेवायला शंभर दिडशे लोक... असा तो सगळा कार्यक्रम असतो..

Posted

Posted

नुकताच सातारा जिल्ह्यातल्या खटाव, माण या दुष्काळी तालुक्याचा दौरा करून आलो. पिण्याच्या पाण्याची भयाण स्थिती नोव्हेंबरमध्येच झालीय. आता एप्रिल-मे महिन्यात तर इथल्या लोकांना पाण्यामुळं स्थलांतर करावं लागणार आहे. आता घरातली गुरढोरं सरकारी छावणीत दाखल झालीत. अनेक वस्त्यांवर आत्ताच पिण्याचं पाणी चार दिवसातनं एकदा येतं.

रणधीर कांबळे

रणधीर कांबळे

1995 पासून पत्रकारितेत. चित्रलेखा, लोकप्रभा, नवशक्ति, अक्षर भारत यांमध्ये लेखन. ई टीव्ही मध्ये राजकीय रिपोर्टिंग. 'झी न्यूज'मध्ये राजकीय प्रतिनिधी म्हणून चार वर्षे काम. लोकसभा, विधानसभा निवडणुका तसंच विधीमंडळ अधिवेशनाचं रिपोर्टिंग. 'आयबीएन लोकमत'मध्ये डेप्युटी न्यूज एडिटर, 'सहारा समय'चे इनपूट एडिटर म्हणून जबाबदारी पार पाडली. सध्या `भारत 4इंडिया`मध्ये पॉलिटिकल एडिटर म्हणून कार्यरत.