मराठवाडी तडका

This is some blog description about this site

मराठवाडी तडका

Posted

Posted

इतिहास घडवणारी माणसं फार कमी सापडतात आणि जी थोडी माणसं असतात ती येणार्‍या पिढीसाठी मार्गदर्शक असतात. नांदेडच्या इतिहासामध्ये अशी माणसं जेमतेम बोटांवर मोजण्याइतकीच झाली आहेत. पुढेही अशी माणसं होतील की नाही, याची शाश्वती नाही. सध्या अस्तित्वात असणारी आणि इतिहास घडवणारी दोन माणसं महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय झाली आहेत. एक म्हणजे संतबाबा नरेंद्रसिंगजी कारसेवावाले आणि दुसरे म्हणजे संतबाबा बलविंदरसिंगजी. या दोन संतांनी नांदेडचं जे काही केलं ते आतापर्यंत कुणीच केलं नसेल. या दोघांना नांदेडचा वर्तमान आणि भविष्यकाळ कधीच विसरणार नाही.

Posted

Posted

महाराष्ट्रामध्ये अलीकडं नकोशीला फेकून देणाऱ्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. या घटना कितीही सरकारनं उपाययोजना अंमलात आणल्या तरी थांबायच्या नाव घेत नाहीत. जेव्हा एखाद्या नकोशीला किंवा अर्भकाला फेकून दिलं जातं तेव्हा त्यानंतर ते अर्भक १८ वर्षांचं होईपर्यंत शासनाच्याच साक्षीनं चाललेली दुकानदारी अलीकडं महाराष्ट्रात प्रचंड स्वरूपात समोर येऊ लागले आहेत. या दुकानदारीला अनेक राजकीय लोकांचा आशीर्वाद आहे. थेट मूल विकण्यापर्यंतही काही जणांची मजल गेली आहे. अलीकडं मूल फेकून देण्याच्या घटना वाढत आहेत. त्यांना फेकून देणारे तर गुन्हेगार आहेतच आहेत; पण त्या मुलाच्या संगोपनाच्या नावानं चाललेली दुकानदारी गुन्ह्यांच्या भागीदारीचं स्वरूप घेऊन पुढे येऊ लागली आहे.

Posted

Posted

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि तेव्हा अत्यंत मागास असलेल्या मराठवाड्याचा संबंध आला नसता तर आज ‘मराठवाडा’ या छोट्याशा विभागाची अवस्था काय झाली असती? हा प्रश्न आज समोर आला तर त्याचं उत्तर अत्यंत गंभीर स्वरूपाचं असेल. मराठवाड्यामध्ये बाबासाहेबांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि गोरगरिबांना स्वाभिमानानं जगण्याचा मंत्रही दिला. आज मराठवाडा हा विभाग ताठ मानेनं जगतो, त्यामागं बाबासाहेबांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेबांनी मराठवाड्याला ‘बापा’सारखं घडवलं.

Posted

Posted

मराठवाड्याचं मागासलेपण आजही कायम आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं तरी आमचा मराठवाडा मागासलेलाच. आज मराठवाड्यामध्ये काय नाही; असं असताना कुठेतरी एकमेकांविरुद्ध विनाकारण द्वेष वाढत चालला आहे आणि त्यामुळं मराठवाड्याला त्याचं नुकसानही सहन करावं लागतं. नांदेड-लातूर वाद हाही गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. कुठल्या राजकीय पक्षानं लावलेला हा वाद नाही किंवा कुठल्या स्वार्थासाठी चिघळला गेलेला हा एखादा प्रश्न नाही, तर गैरसमजातून निर्माण झालेला या दोन्ही जिल्ह्यांचा वाद विकोपाला गेला आहे, ज्याचे परिणाम या दोन्ही जिल्ह्यांच्या विकासासह मराठवाड्याच्या विकासावरही होत आहेत, हे तेवढंच खरं आहे.

Posted

Posted

सीमावर्ती भागात असणार्‍या एक-दोन नव्हे तर साडेतीन हजार खेड्यांचं भवितव्य आज स्वातंत्र्याची ६५ वर्षं उलटली तरी अधांतरीच दिसू लागलं आहे. सरकारचं याकडं लक्ष नाही, असं अजिबात नाही. सरकारचं काम अगदी ‘प्रॉम्प्ट’ आहे; पण कागदोपत्री! आजही साडेतीन हजार खेड्यांतील सरासरी सात लाखांपेक्षा अधिक नागरिक सरकारकडून आणि प्रशासकीय यंत्रणेकडून न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. सीमावर्ती भागात असणार्‍या अनेकांच्या पिढ्या आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळावा यासाठी खर्ची झाल्यात; मात्र वंचितांसाठी आणखीही विकासाच्या दृष्टीनं कुठलंही पाऊल पूर्णपणं उचललं गेलं नाही हे विशेष!

संदीप काळे

संदीप काळे

मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारा तरुण तडफदार पत्रकार म्हणून ओळख. गेल्या 10 वर्षांपासून संदीप पत्रकारितेत. शिक्षण, राजकारण आणि ग्रामीण विकास हे आवडीचे विषय. 'सर्व शिक्षा अभियानातील घोटाळा', 'बोगस विद्यार्थी संख्या' हे विषय महाराष्ट्राच्या समोर आणले. त्याबद्दल यंदाचा बाबा दळवी पुरस्कार.