मराठवाडी तडका

This is some blog description about this site

मराठवाडी तडका

Posted

Posted

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या प्राध्यापकांनी आंदोलनाचं हत्यार उगारलं आहे. आपल्या प्रमुख १४ मागण्यांसह प्राध्यापक संघटनांनी रान पेटवलं आहे. यामुळं युजीसीसह महाराष्ट्रातील आठ विद्यापीठांचं प्रशासन अक्षरशः हतबल झालं आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन दिवसेंदिवस चिघळतच आहे. शासनाकडून यावर काहीतरी तोडगा काढण्यासाठी कुठलंही सकारात्मक पाऊल उचललं जात नाही. या आंदोलनामुळं गुरुजींचा प्रश्न मार्गी लागेल का नाही, हा भाग वेगळा; पण याचा शिक्षण प्रणालीवर प्रचंड परिणाम होऊ लागला आहे, हेही तेवढंच खरं आहे.

Posted

Posted

मोठ्या पडद्यावरचा सिनेमा कायमस्वरूपी अडगळीत टाकला जातो की काय? असं स्पष्ट चित्र निर्माण झालं आहे. दहा वर्षांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये रांगा लागायच्या; पण या रांगा ‘डिजिटल केबल’नं खाऊन टाकल्या आहेत. यामागं सरकारची अवकृपा निश्चितच आहे. आता सरकारनं आणखी एक बेजबाबदारीचं पाऊल उचललं आहे, ते म्हणजे ही चित्रपटगृहं कायमस्वरूपी बंद करायची. एकीकडं चित्रपटगृहांना पूर्णपणं करमाफीचं परिपत्रक सरकारनं काढलं, तर दुसरीकडे याच परिपत्रकावर कुठल्याही थिएटरवाल्याला झेपणार नाही असे धक्कादायक नियमही लावलेत.

Posted

Posted

कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे म्हणजे शैक्षणिक व्हिजन असलेला ‘बापमाणूस’.
अशी शिक्षणाप्रती सकारात्मक दृष्टी असलेली माणसं आज लोप पावत चाललेली आहेत, याचं वाईट वाटतं. हे वाक्य आहे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं. १७ जुलै २००८ रोजी विद्यापीठाला निमसे यांच्या रूपानं नवे कुलगुरू मिळाले. निमसे यांनी आपल्या ‘व्हिजन शिक्षण’ या मिशनच्या माध्यमातून विद्यापीठाला २० वर्षं पुढे नेलं आहे.

Posted

Posted

पाण्यासारख्या निर्मळ विषयावर राजकारण करण्याचा पायंडा गेल्या १० ते १५ वर्षांपासून आंध्रनं पाडला होता. महाराष्ट्र आणि आंध्रच्या सीमेवर असलेल्या बाभळी बंधार्‍याच्या माध्यमातून हे राजकारण सुरू होतं. महाराष्ट्राचं हक्काचं पाणी असताना त्या पाण्यावर विनाकारण आंध्र आणि आंध्रमधील स्वार्थासाठी राजकारण करणारे अनेक जण ‘टोकून’ बसले होते. या सगळ्यांना कोर्टानं वारंवार फटकारलं; पण ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ असं म्हणतात ना तसंच आंध्रचं झालंय. आंध्रच्या पायात बाभळीचा ‘काटा’ असा रुतला की, पुन्हा आंध्र कधीही महाराष्ट्राच्या हक्काच्या पाण्याकडं वाकड्या नजरेनं बघणार नाही.

Posted

Posted

संतांची भूमी म्हणून परिचित असलेल्या महाराष्ट्रामध्येच संतांच्या नावानं बनवेगिरीला ऊत आणला जातोय; यापेक्षा त्या संतांचं दुर्भाग्य काय असणार? संत गाडगे महाराजांच्या नावानं मागं सुरू केलेलं स्वच्छता अभियान आणि त्यामध्ये झालेली बहुतांश ठिकाणची बनवेगिरी आता हळूहळू उघड होऊ लागलीय. अनेक ग्रामपंचायतींना यानिमित्तानं कोट्यवधी रुपये वाटण्यात आले. पण हे वाटण्यात आलेले पैसे आणि त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट झाली काय? आणि आता स्वच्छ झालेल्या गावांची अवस्था काय आहे, यासह अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.

संदीप काळे

संदीप काळे

मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारा तरुण तडफदार पत्रकार म्हणून ओळख. गेल्या 10 वर्षांपासून संदीप पत्रकारितेत. शिक्षण, राजकारण आणि ग्रामीण विकास हे आवडीचे विषय. 'सर्व शिक्षा अभियानातील घोटाळा', 'बोगस विद्यार्थी संख्या' हे विषय महाराष्ट्राच्या समोर आणले. त्याबद्दल यंदाचा बाबा दळवी पुरस्कार.