EasyBlog

This is some blog description about this site

Blog posts tagged in भारतावर जगानं टाकलेली नजर
Posted

Posted

वॉलस्ट्रीट जर्नल (wallstreet journal) हे जगातील एक मोठं आणि विश्वासार्ह, तसंच प्रतिष्ठित वर्तमानपत्र मानलं जातं. २००८ मध्ये त्यांच्या काही स्टोरीजवर मी काम करत होतो. एरिक बेलमन या वार्ताहरासोबत मी दुभाष्याचं काम केलं. लोणार सरोवराजवळच्या गांधारी नावाच्या छोट्या गावात जायचं आहे, असं बेलमननं सांगितलं तेव्हा मी चकित झालो. कारण वॉलस्ट्रीट जर्नल हे प्रामुख्यानं उद्योग जगतावर आणि क्वचित राजकारणावर स्टोरी करत असे. इतक्या छोट्या खेड्यात त्यांच्यासाठी कोणती स्टोरी असणार? पण गांधारीतील १४ गावकरी मुंबईजवळ भिंत बांधताना ती कोसळून झालेल्या अपघातात मरण पावले. ही घटना २००६ मध्ये घडली होती. त्याला दोन वर्षं झाल्यानिमित वॉलस्ट्रीट ती स्टोरी करत होते. त्यात म्हटलं होतं की, भारताच्या प्रगतीचा वेग वाढत असताना भारतातील अपघातांचं प्रमाणही वाढत आहे. मरण पावलेली बरीच मंडळी एकाच कुटुंबातील होती. या अपघातात ५० जण जखमी झाले. त्यांना काहीही नुकसानभरपाई मिळाली नाही. १४ मृतांच्या नातेवाईकांना एक लाख रुपये मिळाले. ही सारी माहिती देऊन वॉलस्ट्रीटनं म्हटलं की, भारताच्या विकासवाढीचा वेग नऊ टक्के असताना देशभर रस्ते, इमारती, खाणी, धरण, बांधकाम यावर होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही वाढलं आहे. बांधकाम करणाऱ्या मजुरांची सुरक्षा नसल्यामुळं अपघातांचा धोका वाढतो आहे. अशा मजुरांना कोणतंही प्रशिक्षण आणि सुरक्षा साधनं दिली जात नाहीत. २००६मध्ये १० मोठे अपघात घडले. २००७ मध्ये १४, तर मार्च २००८पर्यंत ३१.