EasyBlog

This is some blog description about this site

Blog posts tagged in राजकारणातली रेस
Posted

Posted

अब्बास-मस्तान दिग्दर्शित ‘रेस’ या चित्रपटात विदेशातील अश्वशर्यतींची दृश्यं आहेत. परंतु अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, राजेश खन्ना यांच्या कित्येक चित्रपटांत मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवरचे प्रसंग आहेत. नायक वा खलनायकाचा आर्थिक स्तर आणि त्याची जीवनशैली दर्शवण्याचा सोपा उपाय म्हणजे कॅमेरा महालक्ष्मीच्या दिशेनं नेणं; एकेकाळी गीतकार राजेंद्र कृष्णला इथंच लाखो रुपयांचा जॅकपॉट लागला होता. रणजीत स्टुडिओचा मालक चंदूलाल शाह रेस नि जुगारातच कंगाल झाला. त्याउलट पुण्याच्या हसन अलीच्या मालकीचे घोडे आहेत आणि त्याच वेळी तो ‘एक्स्पोर्ट-इम्पोर्ट’चे काय काय उद्योग करतो ते सर्वश्रुत आहे. मराठीत विलासदत्त राऊत यांची रेसकोर्सवर ‘चौखूर’ ही कादंबरी आहे. ती पुण्याच्या काँटिनेंटल प्रकाशनच्या दिवंगत अनिरुद्ध कुलकर्णी यांनी प्रसिद्ध केली; त्यांचे आजोबा अश्वपारखी होते. आता मात्र महालक्ष्मी रेसकोर्सचा भाडेपट्टा टर्फ क्लबला वाढवून देऊन ही जागा सार्वजनिक मनोरंजन मैदानासाठी (थीम पार्क) मोकळी करण्याचा प्रस्ताव शिवसेनेनं महापालिका आयुक्तांकडं दिला आहे. तो प्रत्यक्षात आल्यास रेसकोर्स इतिहासजमा होईल.