पुणे-नाशिक रस्त्यावर मंचरजवळ एका हॉटेलचं उद्घाटन रविवारी माझ्या हस्ते झालं. घोडेगावच्या काळे कुटुंबीयांनी भागीदारीत हे हॉटेल सुरू केलं आहे. घोडेगावच्या आबासाहेब काळेंनी १९४८ मध्ये त्या गावात न्यू इंडिया नावाचं हॉटेल सुरू केलं होतं. मिसळ, भजी अशा खास मराठी पदार्थांसाठी हे हॉटेल लोकप्रिय आहे. शेती करतानाच सोबत आणखी काही उत्पन्न असावं म्हणून काळे यांनी हॉटेल सुरू केलं. तीन पिढ्यांच्या व्यावसायिक प्रयत्नांमुळं हॉटेल व्यवसायात काळेंना यश मिळालं. रविवारी सुरू झालेलं हॉटेल हे काळे कुटुंबीयांच्या व्यावसायिक यशाचं पुढचं पाऊल आहे. नव्या काळाला अनुसरून अत्यंत आकर्षक आणि आधुनिक रेस्टॉरंट त्यांनी सुरू केलं आहे. शहरी लोकांनाही ते आवडेल. शेतकर्यांची मुलं व्यवसायात यशस्वी पावलं टाकत आहेत, हे समाधानकारक चित्र या निमित्तानं दिसलं.
EasyBlog
This is some blog description about this site
येत्या 28 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या आगामी बजेटमध्ये स्त्री-सुरक्षेसाठी विशेष तरतूद होण्याची अपेक्षा आहे. कदाचित टॅक्समध्ये अधिक सवलत आणि महिलांसाठी व्यावसायिक कर्जं मंजूर करण्याची प्रक्रिय सुलभ होणं, अशा बाबी यात असतील. दिल्लीतील सेंटर फॉर बजेट अॅण्ड गव्हर्नन्स अकाऊंटॅबिलिटी (सीबीजीए) हा गट सरकारी खर्चाच्या स्वरूपाचा पाठपुरावा करत असतो. त्यांना जेंडर बजेटिंग संदर्भात अनेक त्रुटी आढळल्या आहेत.
संतांची भूमी म्हणून परिचित असलेल्या महाराष्ट्रामध्येच संतांच्या नावानं बनवेगिरीला ऊत आणला जातोय; यापेक्षा त्या संतांचं दुर्भाग्य काय असणार? संत गाडगे महाराजांच्या नावानं मागं सुरू केलेलं स्वच्छता अभियान आणि त्यामध्ये झालेली बहुतांश ठिकाणची बनवेगिरी आता हळूहळू उघड होऊ लागलीय. अनेक ग्रामपंचायतींना यानिमित्तानं कोट्यवधी रुपये वाटण्यात आले. पण हे वाटण्यात आलेले पैसे आणि त्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट झाली काय? आणि आता स्वच्छ झालेल्या गावांची अवस्था काय आहे, यासह अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत.
पाऊस संपून काही महिनेच झालेत. कोकणापासून विदर्भापर्यंत नद्यांमधलं पाणी ओसरत आलंय. रब्बी हंगामाच्या सुरुवातीलाच पाण्याची बोंब ऐकू येऊ लागलीय.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. जवळजवळ 65 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे, तर 25 टक्के `जीडीपी` हा शेतीक्षेत्रातून येतो. `ग्लोबलायझेशन` आणि `इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजीच्या` या युगात कृषी क्षेत्रामध्ये प्रचंड अशी क्षमता आणि संधी आहे. `इन्फॉर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी` हा भारताच्या कृषी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वाचा खांब आहे. यामुळंच नामवंत आय. टी., टेलिकॉम कंपन्या आणि जागतिक वृत्तसंस्थांनाही कृषिक्षेत्राची भुरळ पडत आहे. या आय.टी.च्या युगामध्ये माध्यमामध्येही अनेक मोठे बदल होत आहेत.