स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष लोकसभा सदस्य राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पश्चिम महाराष्ट्रात ऊस दर वाढ आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या आंदोलनात दोन शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. त्या कुंडलिक कोकोटे आणि चंद्रकांत नलावडे यांच्या बलिदानाला अभिवादन. आपल्या रास्त ह्क्कासाठी लढणाऱ्या बळीराजालाच बलीदान का करावे लागते? या लाख मोलाच्या प्रश्नाचे उत्तर शोधणे जरूरीचे आहे. बलीदान देणाऱ्यांची संख्या वाढत जाते आणि शेतकऱ्यांची लूटही वाढत जाते.
EasyBlog
This is some blog description about this site
नमस्कार!
यश म्हणजे काय तर योग्य वेळेला, योग्य कारणांसाठी योग्य पद्धतीनं केलेल्या योग्य गोष्टी, असं मी मागच्या संवादात म्हटलं होतं. आता योग्य गोष्ट म्हणजे काय, तर अशी एखादी गोष्ट, जी करण्यानं आपल्याला काही फायदा होणार आहे, बाकी ती खरंच योग्य आहे का नाही ते प्रत्येकावर अवलंबून आहे. मला विचारलं तर परत अजून एक यशाची व्याख्या डोळ्यासमोर येते आणि ती अशी आहे. सातत्यानं वाढत आणि बदलत जाणाऱ्या वैयक्तिक मूल्यवान ध्येयांची पूर्तता.
औद्योगिकदृष्टया भारताची प्रगती व्हावी यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काही धोरणं आखली होती. त्या धोरणान्वये भारतातील सर्वसामान्य माणूस उद्योजक कसा बनेल आणि आपल्या पायांवर उभं राहून तो अधिकाधिक स्वावलंबी कसा होईल याबाबतची कारणमीमांसा केली होती. कालांतरानं भारतात औद्योगिक क्षेत्रात बरीच प्रगती झाली. शहरांबरोबरच ग्रामीण भागातून लहानसहान उद्योग उभे राहू लागले.
एफडीआयचा प्रस्ताव मंजूर करून घ्यायला सरकारला मोठ्या 'करामती' कराव्या लागल्या. लोकसभेत सप आणि बसप यांनी वॉकआऊट केला. राज्यसभेत बसपकडून मतदान करून घेतलं. अखेर काँग्रेसनं दोन्ही सभागृहात हा ठराव मंजूर करून घेतलाच. माझ्यासारख्या एफडीआय समर्थकांनी या निर्णयाचं स्वागत केलं. पण मला एक प्रश्न पडतो की, सरकारला हे करायचंच होतं तर ते त्यांनी यापूर्वी का केलं नाही? इतकी वर्षं का वाट पाहिली? की सरकारला करायचंच नव्हतं, आता नाईलाजानं 'जुलमाचा राम राम' करावा लागला? नेमकं कारण काय?
पाणी: राजकीय प्रश्न Featured
भ्रष्टाचाराचं शेवाळ दूर करून पाणी प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे. तसं केल्यास, पाणी प्रश्नाच्या विविध गंभीर पैलूंचं अति सुलभीकरण / चिल्लरीकरण होणार नाही. अव्वल दर्जाचा राजकीय प्रश्न म्हणून त्याच्या सोडवणुकीसाठी धोरण व रणनीती निश्चित करता येईल.