जगातील कोणत्याही लोकशाहीच्या पोषक वाढीसाठी सशक्त प्रसारमाध्यमांची नितांत आवश्यकता असते. त्यासाठीच आपल्या लोकशाहीचे चार प्रमुख स्तंभ ठरवताना घटनाकारांनी प्रसारमाध्यमांना चारपैकी एका स्तंभाचा दर्जा बहाल केला, यातच सारं काही आलं. बदलत्या काळानुसार प्रसारमाध्यमांचं रूप आणि साधनंही बदलत गेली.
EasyBlog
This is some blog description about this site
न्यू एज मीडिया Featured
पूर्वापार प्रचलित असलेल्या जाचक व जुलमी अशा वर्णव्यवस्थेचं अनौरस अपत्य असलेली जातिव्यवस्थेची कीड हाच या समृद्ध अशा महान देशावर लागलेला मोठा कलंक आहे. जाती व्यवस्थेचं समूळ उच्चाटन करण्यासाठी अनेक थोर समाजसुधारकांनी अपार कष्ट सोसले. भारतातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या महापुरुषांनी अनेक अनिष्ट प्रथा, अंधश्रद्धा, सामाजिक दुर्गुण, समाजव्यवस्थेला पांगळ्या करणार्या किडीचं अस्तित्व संपवण्यासाठी प्रचंड यशस्वी असे प्रयत्न केले. स्वातंत्र्यानंतर जेव्हा संविधान निर्मितीची वेळ आली तेव्हा विधवा विवाह, बालविवाह बंदी, स्त्री-पुरुष समानता, अस्पृश्यता, जातीयवाद आणि सर्व प्रकारच्या तत्सम विषमवृत्तीला आळा बसावा या उदात्त हेतूनं या वृत्तीविरोधातल्या सर्व कायद्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेमध्ये अंतर्भूत केलं. शतकानुशतकं जातीयतेच्या गुलामगिरीत खितपत पडल्यानं; तसंच सामाजिक आणि आर्थिक अवनतीमुळं शुद्रातिशुद्रांची जी भयावह स्थिती झाली होती त्यावर एकच उपाय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दृष्टिपथास पडत होता आणि तो म्हणजे समान प्रतिनिधित्व.