जागर पाण्याचा

शशिकांत कोरे, सातारा
 राज्यात एकीकडं पाणीटंचाई तीव्र होत असताना दुसऱ्या बाजूला पाण्याचा जागर सुरू झालाय. अनेक ठिकाणी लोक स्वतःहून पुढं येत स्वयंस्फूर्तीनं काम करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न करतायत. साताऱ्यातील ऐतिहासिक गोडोली तलावातील गाळ काढण्याचं काम श्रमदानातून सुरू झालंय. लोकसहभातून लोकपहाऱ्यात होत असलेल्या या कामामुळं सातारकरांना भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे.
 
शशिकांत कोरे, सातारा
 दुष्काळी भागात पाण्याचा जागर सुरू झालायं. पावसाच्या पाण्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी दगडी बंधाऱ्यांऐवजी सिमेंटचा नाला बांधून शेततळं वळण बंधारा आणि नाला सरळीकरण या प्रकारांचा उपयोग होणार आहे. यासाठी राज्यातील पहिलं पाणलोटचं मॅाडेल माण तालुक्यातील बिदाल इथं साकारतंय.
 
शशिकांत कोरे, सातारा
दुष्काळी भागात साखळी पध्दतीनं सिमेंट बंधारे बांधण्याची मात्रा लागू पडलीय. कायम दुष्काळी माण तालुक्यातील पिंपरी गावाला याचा चांगलाच फायदा झाला असून परिसरातील विहिरींना आता पाझर फुटलेत. त्यातून 'पिंपरी सिमेंट बंधारा प्रकल्प' एक आदर्श मॉडेल बनू्न पुढं येतोय.