स्पेशल रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट
शेतीसाठी पंतप्रधान सिंचन योजना, शेतीच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, किसान विकास पत्र योजना पुन्हा सुरु करणार बाजारसमित्यांना पर्याय म्हणु खाजगी मार्केट सुरु करणार...अशा शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक तरतुदी केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आल्यात, त्यामुळं शेतकऱ्यांच्या विकासासाठी हा अर्थसंकल्प दुरगामी फायद्याचा ठरणार आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
अरे भय्या, कल गांव से भाई का फोन आया था....कह रहा था की थोडे पैसे भिजवा दो, इस साल सब्जी बहोत सस्ती बीकी....तो मैने कहा भय्या मुझेही थोडे पैसे भेज तो क्योंकी यहा पे सब्जी बडी ही महेंगी मिलती है.....एका राजकीय पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची ही जाहीरात...आतापर्यंत शेतकरी आणि त्यांचे प्रश्न याला राजकिय पक्षांनी एवढं महत्व दिलं नव्हतं....या निवडणुकीत ही जाहीरात पाहुन किमान कोणाला तरी ही दरी भरुन काढावीशी वाटली याचा शेतकऱ्यांना जरा दिलासा मिळाला.
 
ब्युरो रिपोर्ट, मुंबई
वातावरणात होणाऱ्या बदलामुळं हवामानाचा समतोल बिघडु लागलाय. त्याचंच उदाहरण म्हणजे राज्यात सुरु असलेला अवकाळी पाऊस. भर उन्हाळ्यात एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पाऊस हजेरी लाऊ लागलाय. नुसता पाऊसच नाही तर त्याच्याबरोबर असणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतंय. मार्चमध्ये झालेल्या प्रचंड गारपिटीनं झालेल्या नुकसानीतुन शेतकरी उभारी घेतच होता की अवकाळी पावसानं त्याचं कंबरडं मोडायला आपली हजेरी लावली.
 
प्रवीण मनोहर, अकोला/गोंदिया
बदलत्या काळात स्त्री-पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. एकेकाळी पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलाय. महिला रिक्षा चालवतात, अवजड वाहन चालवतात. अहो, एवढंच कशाला त्या पंक्चरचं दुकानंही चालवतात. म्हणजे, चक्क ट्रकच्या भल्यामोठ्या टायरातून ट्य़ूब काढून पंक्चरला जोड देऊन एकदम ओके करून देतात. अकोला ते अकोट मार्गावरील चोहट्टा बाजारातील सरिताताईंचं किंवा गोंदियाच्या भागरताबाई फुंडेंचं दुकानं त्यामुळंच सर्वांच्या औत्सुक्याचा विषय आहे.
 
ब्युरो रिपोर्ट, बदलापूर
नियतीनं त्यांच्या डोळ्यातल्या प्रकाशज्योती कायमच्याच हिरावून घेतलेल्या, आयुष्य अंधःकारमय झालेलं... मात्र अशा अनेकांच्या अंधःकारमय आयुष्यात आशेचा किरण घेऊन आल्या त्या बदलापूरच्या सुहासिनीताई मांजरेकर. अंध मुलांच्या प्रगतीसाठी त्यांनी विशेष अशा 'प्रगती अंध विद्यालया'ची स्थापना करून अनेकांचं आयुष्य सुखमय केलं. विविध उपक्रम राबवत गेली सत्तेचाळीस वर्षं अंध मुलांच्या सेवेसाठी निस्वार्थपणं झटणाऱ्या सुहासिनीताईंना आज जागतिक महिला दिनानिमित्त 'भारत4इंडिया'चाही सलाम...
 
ब्युरो रिपोर्ट, कोल्हापूर
आज महिला सबलीकरणाचा नारा सर्वत्रच घुमतोय. पण, ज्या काळी महिला खरोखरच अबला होती त्या काळाची म्हणजे सुमारे 35 वर्षांपूर्वींची ही गोष्ट! बलुतेदारीवर डोस्की, दाढी करून प्रपंचाचा गाडा हाकणारा नवरा अचानक देवाघरी गेल्यानंतर तिच्यावर आभाळच कोसळलं. पण तिनं धीर खचू दिला नाही. वस्तारा, कात्री हाती घेतली आणि लोकांचे केस, दाढी करू लागली. पदरी असलेल्या चार पोरींना तिनं लहानाचं मोठं केलं. प्रपंचाला लावलं. आज ती 70 वर्षांची आजी झालीय. परिस्थिती पिच्छा सोडत नसल्यानं अजूनही ती चाळीशीआडचे डोळं मिचमिचत लहान मुलांचे केस कापते,
 
विवेक राजूरकर, औरंगाबाद
बहिणीचं लग्न झाल्यानंतर तिनं आईबाबांना आधार देण्यासाठी शिक्षण घेत घेत त्यांच्या व्यवसायात मदत करायला सुरुवात केली. पण, तुला हे कसं जमणार, अशा काहीशा बेसूर प्रश्नांनीच तिचं स्वागत झालं. पण ती मागे हटली नाही. उराशी जिद्द बाळगून ती छोटा हत्ती चालवायला शिकली आणि मिनरल वॉटर्सच्या मोठमोठ्या बाटल्यांचं पार्सल पोहोचवू लागली. आता लोक म्हणतात... बघा अशी लेक असल्यावर वंशाला आणखी काय हवं? अपर्णा चेंबरोलूची ही कहाणी शहरात आज चर्चेचा विषय झालीय.  
 
ब्युरो रिपोर्ट, सातारा
महिलांनी शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं आवश्यक असताना स्वसंरक्षणही करण्यास शिकलंच पाहिजे. तेव्हाच महिला सबलीकरणास खरी सुरुवात होईल. आज या महिला मुक्तिदिनाच्या निमित्तानं 'भारत4इंडिया'नं अशाच काही महिला आणि त्यांची यशोगाथा आणलीय. साताऱ्यातील शिक्षकाच्या मुलीनं या आर्थिक दुर्बल महिलांना एकत्र आणुन त्यांना स्व:ताच्या  पायावर उभं केलं. पाहूयात...त्यांच्या प्रयत्नांची ही गाथा... 
 
ब्युरो रिपोर्ट, ठाणे
पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात पिकणारा दर्जेदार तांदूळ 'महाराईस' या ब्रॅंडनं ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. राज्य सरकारच्या पणन विभागानं हा उपक्रम हाती घेतला असून त्याची सुरवात नुकतीच ठाण्यातून झाली. भेसळ नसलेला उत्तम प्रतिचा तांदूळ योग्य भावात मिळत असल्यानं ग्राहकांच्या त्यावर अक्षरक्ष: उड्या पडल्या. आता विविध शहरांमध्ये भरणाऱ्या धान्य महोत्सवातून 'महाराईस'ची विक्री केली जाणार असून मुंबई, पुण्यात तो मॉलमधूनही उपलब्ध होणार आहे. विविध खाजगी कंपन्यांच्या बासमती एवढाच हा 'महाराईस' ब्रॅंड वाढवण्याचा संकल्प पणन मंडळानं केलाय.
 
रोहिणी गोसावी, पुणे
साहसवीरांना साद घालणारा आणि आव्हान देणारा सह्याद्री...सह्याद्रीच्या कड्यांमध्ये रमणारी शहरी आणि ग्रामीण तरुणाई... आपल्या शरीराची आणि मनाची ताकद पणाला लावणाऱ्या टीम्स... हरणार किंवा जिंकणार याचा फार विचार न करता फक्त रेस पूर्ण करण्याची जिद्द...अशा प्रकारचा अनुभव येतो तो पुण्यात होणाऱ्या 'एन्ड्युरो थ्री' रेसमध्ये. अतिशय साहसी रेस गेल्या 12 वर्षांपासून नॅशनल एज्युकेशन फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात येते. यावर्षीही तितक्याच उत्साहानं आणि साहसानं ही रेस पार पडली.