स्पेशल रिपोर्ट

शेतमाल दर तुमच्या हाती

जयश्री चित्रे

कमोडिटी मार्केट म्हणजे जणू तुमच्या गावचा बाजार. फक्त तो होतो, मोठ्या प्रमाणात, मोठ्या शहरात. पण यात एक गोष्ट नक्की आहे. ती म्हणजे शेतकरी. कारण शेतकरीच नाही तर बाजार नाही, शेतीमाल नसेल तर विकणार काय? निर्यात काय करणार? 

छोट्या शेतकऱ्यांचं नेहमीच शोषण केलं जातं. ते करणारे असतात, बहुतेक व्यापारी, सावकार, मध्यस्थ... ही यादी खूपच मोठी आहे आणि धक्कादायकही. अर्थात नैसर्गिक आपत्तीसारख्या संकटांपुढंही माणूस अगदीच हतबल असतो, ते वेगळंच. 

या सर्व अडथळ्यांपासून आपण आपले पीक योग्य भावात बाजारात कसे विकायचे, हे या लेख मालिकेतून तुम्हाला सांगायचा एक प्रामाणिक प्रयत्न आम्ही करणार आहोत. यात जवळपास मार्केट नसणे, गरजेपोटी भावाची घासाघीस करू न शकणे, माहितीचा अभाव या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या अवती भवती होत असलेल्या संशोधनाची माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचे काम आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत.

ग्रामीण सेवा केंद्रांनी एक व्यावसायिक आराखडा तयार केला आहे. ज्यात पेरणी, कापणीपासूनच्या सर्व पायऱ्यांमध्ये शेतकरी एकाच व्यासपीठावरून आपल्या पिकाचा सौदा करू शकतो . (ग्रामीण सेवा केंद्र एक भागीदारी तत्वावर चालणारी संस्था आहे. मल्टी कमोडीटी ए@सओMज (मकक्ष) व भारतीय टपाल विभागाची ) ग्रामीण सेवा केंद्रांनी त्यांच्या  २३८ शाखांनी १८८६  गावांना जोडले आहे. ग्रामीण सेवा केंद्राने टपाल विभागाच्या मदतीने शेतकऱ्यांना सज्ञान बनवण्याचे कार्य जोमाने वाढवले. मल्टी कमोडिटी ए@सओMज (मकक्ष) व नॅशनल कमोडिटीनी ए@सओMज  यातली क्षमता ओळखून ग्रामीण सेवा केंद्रसोबत नाते जोडले. यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न तर वाढवलेच त्याचसोबत जमिनीचा कसही सुधारला. यामध्ये सर्वात मोठा महत्वाचा घटक म्हणजे शेतकऱ्यांचा श्रद्धा व विश्वास वाढला.  याच्या व्यतिरिक्त पिकलेल्या पिकाची साठवण करणे, खत, कीटकनाशक या सर्व गोष्टी विचारात  घेतल्या जातात. आपण या सर्व बाबी या ठिकाणी जाणून घेऊ. 

 मकक्ष ( मल्टी कमोडीटी ए@सओMज ) आपल्याला पिकाच्या भावाचा अंदाज देतो. पूर्ण देशभरातून आकडेवारी येते.   कुठल्याही कमोडिटीची  (उदा.  तांदूळ, गहू) देशात लागवड किती झाली आणि त्याचे भाव किती आहेत, हे समजते. पीक कमी झाले की भाव वाढतात. आवश्यक गोष्टींची मागणी पुढे मागे होऊ शकते पण संपत नक्कीच नाही.  बऱ्याचदा छोटे शेतकरी गरजेपोटी मिळेल त्या भावात पीक विकायला अगतिक होतात. पण इथं त्यांना भावाचं ज्ञान मिळतं. त्यामुळं सौद्यात नक्कीच फरक पडतो.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या मकक्ष शी आपण कसे निगडीत होऊन, आपले पीक कसे वाढवू, प्रत सुधारू व भाव चांगला कसा मिळवू शकतो ते बघू शकतो.

शेवटी आपलं नातं मातीशी आहे. त्या मातीत अंकुरणाऱ्या पिकाशी आहे. हे नातं आपण जोपासूयात. ‘भारत4इंडिया’च्या याच व्यासपीठावर दृढ करुयात.

 


Comments (8)

 • Guest (पंकज कोंडेकर)

  शेवटी आपलं नातं मातीशी आहे. त्या मातीत अंकुरणाऱ्या पिकाशी आहे. हे नातं आपण जोपासूयात.

 • GO HEAD JAYSHREE MADAM

 • Guest (Nitin Rahalkar)

  First of all congratulations on launching of "www.bharat4india.com" and my appreciation for the concept behind "www.bharat4india.com". Undoubtedly its a noble concept & cause. The small yet precise introduction of "www.bharat4india.com" is commendable. However lot of clarity needed over the most sensitive matter of "How to win over market forces like 'Wyaapaari', 'Saawkaar' and 'Madhyasth'. Also, how "bharat4india.com" will help farmers? Or in what way the association with "bharat4india.com" will help small farmers is not very clear.F

 • Guest (smita)

  good

 • Guest (Dr. Ramkrishna Chhangani)

  Very True

Load More

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.