राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे: भाग - २मुंबई - मुंबईतला परप्रांतीयांच्या विरोधातला लढा यापुढंही अधिक आक्रमकपणे सुरूच राहील, असं राज ठाकरेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बजावलं. याशिवाय मुंबईत अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई केल्यानं सहाय्यक पोलीस आयुक्त ढोबळे यांची बदली झालीय. आता फेरीवाल्यांनी त्यासाठी जर मोर्चा काढला तर त्यांना मनसेस्टाईल उत्तर दिलं जाईल, असा इशाराही राज यांनी दिला. अनधिकृत फेरीवाले परप्रांतीय आहेत. त्यांच्यावर महापालिकेनं कारवाई करावी. त्या कारवाईविरोधात ते कशी आरडाओरड करू शकतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. Tags |
||
Comments
|