नक्षत्रांचे देणे

ब्युरो रिपोर्ट

डोंबिवली - ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ डोंबिवलीत झी मराठीच्या सौजन्यानं 'नक्षत्रांचे देणे' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.  या कार्यक्रमात खळे काकांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांमधून त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी गायक अजित परब,  ऋषिकेश रानडे,  सचिन इंगळे, प्राजक्ता रानडे,  विभावरी आपटे- जोशी आणि अपर्णा संत यांनी खळे काकांची गाणी गायली. तर या कार्यक्रमाचं निवेदन अरुण नुलकर यांनी केलं. 'भारत4इंडिया'  याचा ऑनलाईन मीडिया पार्टनर होता.  अॅमी अॅमोर इव्हेंट कंपनी अॅण्ड इंडियन मॅजिक आयनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.