आदिवासींचा उलगुलानराहुल विळदकर राहुरी - विद्रोही साहित्य संमेलनाच्या विचार मंचावरून आपला आवाज सर्वांपर्यंत पोहोचावा यासाठी नंदूरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातले मजूर आदिवासी शेतकरी आले होते. उलगुलान मोर्चा ज्यांनी आपल्या जोरदार आवाजानं गाजवला त्या ७५ वर्षांच्या झेलाबाई वसावे यांचा संमेलनात विशेष सत्कार करण्यात आला. कित्येक हजार वर्षांपासून आदिवासी जंगलाचा पुत्र म्हटला जातो. पण सरकारला मात्र त्याला इ्थून उठवून लावण्याचीच घाई झालीय. आता आम्ही हटणार नाही, आमच्या जमिनी आहेत, त्या कोणाला देणार नाही. आम्ही मरू, पण झुकणार नाही, असा निर्धार 'भारत4इंडिया'शी बोलताना झेलाबाईंनी व्यक्त केलाय. आपल्या भिलोरी भाषेत त्यांनी आपली मतं व्यक्त केली. Tags |
||
Comments
|