हळदगावात बहरला जिद्दीचा मळा...वर्धा- पतीचं निधन झालं अन् सर्वस्व हरवलं. पुढचं आयुष्य त्याच्या आठवणीत झुरत झुरत जगायचं...ही झाली कुठल्याही सामान्य बाईची कथा. पण या कथेला वर्ध्यातल्या हळदगावातल्या एका महिलेनं वेगळं वळण दिलंय. हे वळण आहे, कष्टाचं, जिद्दीचं. शेतात शिंपलेल्या घामाचं अन् त्यातून उगवलेल्या मोत्यांचं...त्यांचं नाव लता पाटील. पतीनिधनानंतर खचून न जाता त्यांनी नव्यानं कंबर कसली अन् 75 एकर शेतीत नंदनवन फुलवलं... Tags |
||
Comments
|