मेळघाटात सौरऊर्जेनं पाणीपुरवठा

अमरावती - मेळघाटाच्या भाळी कुपोषण पाचविला पुजलंय. दारिद्र्य, शिक्षण याबरोबरच पायाभूत सुविधांचा अभाव त्याला कारणीभूत आहे. वीज नाही म्हणून इथल्या आदिवासी पाड्यांना शुद्ध पाणीपुरवठा करता येत नाही. त्यावर आता प्रशासनानं सौरऊर्जेची मात्रा लागू केलीय. यामुळं जवळपास पन्नासहून अधिक पाड्यांना नळानं शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ लागलाय. दारात पाणी आल्यानं आदिवासींच्या जगण्याचे संदर्भच बदलले असून, महिलांना मुलाबाळांकडं लक्ष द्यायला वेळ मिळतोय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.