डॉक्युमेंटरी निघालीय...

ब्युरो रिपोर्ट

वाडा - खडतर जीवनावर मात करुन आदिवासी कुटुंबातील जयश्री खरपडे शाळा शिकतेय. तिच्यावर डॉक्युमेंटरी फिल्म निघालीय.

तिला आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रथम पुरस्कार मिळालाय.


 

वाडा तालुक्यातील हरसाली गावात जयश्रीचा जन्म झाला. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं आईवडील वीटभट्टीवर मजुरी करून पोटाची खळगी भरत असत. जयश्री दुसरीत शिकत असताना लहान भावाला सांभाळण्यासाठी तिला शाळेतून काढण्यात आलं. त्यानंतर जयश्री आपल्या आईवडिलांबरोबर वीटभट्टीवर काम करू लागली. वीटभट्टीवर काम करताना होणारा त्रास तिला जाणवायचा. ती आपल्या आईला हे काम करण्यास विरोध करायची. यासाठी तिला आईचा मार खावा लागत होता. जयश्रीला

शिकायची खूप इच्छा होती. यातच एकदा गावात गाव कमिटीची मीटिंग लावली असता खोडकेभाऊंनी लोकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. यानंतर जयश्रीच्या वडिलांनी तिचं उसगावच्या विधायक संसदच्या एकलव्य परिवर्तन विद्यालयात अॅडमिशन घेतलं आणि जयश्रीच्या जीवनाला कलाटणी मिळाली.

जयश्री आता आठवीत शिकत असून तिच्यातील असलेल्या अनेक कलागुणांना इथं वाव मिळालाय. कराटे, संगीत, कॉम्प्युटर, नृत्य, गायनात ती तरबेज असून तिला अनेक बक्षिसंही मिळालीत. अशा या गुणी जयश्रीच्या जीवनावर आधारित अमेरिकेतील जॉयसे चोप्रा आणि कॅटरिना यांनी 'फायर इन अवर हर्ट' नावाची डॉक्युमेंटरी फिल्म तयार केली. या डॉक्युमेंटरी फिल्मचं दिग्दर्शन स्वत: जयश्रीनं केलंय.

अमेरिकेतील न्यूयॉर्क इथं आयोजित डॉक्युमेंटरी फेस्टिव्हलमध्ये या डॉक्युमेंटरी फिल्मला पहिला नंबर मिळाला. या स्पर्धेत पन्नास देशांच्या डॉक्युमेंटरी फिल्म्सचा समावेश होता. खरोखरच चिखलात उमललेलं जयश्री नावाचं हे कमळ शिक्षणाची आस असूनही त्यापासून वंचित असणाऱ्या तिच्यासारख्या प्रत्येक मुलासाठी आदर्श आहे.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.