प्रकल्पग्रस्तांच्या देशात...

बाई मी धरण, धरण बांधते...माझं मरण कांडते, या कवितेच्या ओळी किती सार्थ आहेत, याचा प्रत्यय आजही पदोपदी येतो. अगदी जुन्या कोयनेच्या धरणापासून ते अलीकडच्या तारळी धरणापासून प्रकल्पबाधित झालेल्यांचे प्रश्न कायम आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीमधून अगदी मेळघाट परिसरही सुटलेला नाही. तिथला कुपोषित शेतकरीही जीवाच्या आकांतानं हक्कांसाठी लढतोय. मल्हारी गावातील सुरेश बोरेकर या तरुण शेतकऱ्यानं नुकतंच आत्मदहन करून स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्यानं हा प्रश्न पुन्हा विदर्भात ऐरणीवर आलाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.