सजली व्यंगचित्रांची मैफिल

ब्युरो रिपोर्ट

पुणे - व्यंगचित्रकारांचं चौथं अखिल भारतीय संमेलन पुण्यात सुरू असून आज त्याचा समारोप होतोय. यामुळं सर्वसामान्य नागरिकांना व्यंगचित्रांची मेजवानीच मिळतेय.


 

सरस्वती वाचनालय आणि कार्टुनिस्ट कम्बाईन यांनी या आगळ्यावेगळ्या संमेलनाचं आयोजन केलंय. प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण या व्यंगचित्र संमेलनाचे अध्यक्ष आहेत. अनेक प्रसिद्ध व्यंगचित्रकारांची व्यंगचित्र या संमेलनात चाहत्यांना बघायला मिळतायेत. त्यात शि. द. फडणीस, वसंत सरवटे, ज्ञानेश सोनार, विकास सबनीस, विजय पराडकर, प्रभाकर झळके, प्रशांत कुलकर्णी, श्रीनिवास देसाई, चारुहास पंडित अशा प्रतिभावंत व्यंगचित्रकारांचा यात समावेश आहे. आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅनचा रोमहर्षक प्रवास डीव्हीडीच्या माध्यमातून या संमेलनात चाहत्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलाय. या संमेलनात व्यंगचित्रांचं प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन, व्यंगचित्रांची प्रात्यक्षिकं असा एक खजिना चाहत्यांसाठी खुला आहे.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.