सातारच्या अंधांनी केले वृक्षारोपण

माणसापुढं आज प्रदूषण आणि 'ग्लोबल वॉर्मिंग' हे प्रश्न आव्हान बनून उभे आहेत. त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत असले तरी त्यांची व्याप्ती पाहता अजून खूपच मोठा पल्ला गाठण्याची गरज आहे. या सर्वांवर एक प्रभीवी उपाय आहे तो म्हणजे वृक्षारोपणाचा. आज 'झाडं लावा आणि झाडं जगवा' असा संदेश दिला जातो. सातारच्या अंध बांधवांनी नेमका हाच संदेश समाजाला देण्यासाठी वृक्षारोपणाचा उपक्रम राबवून सर्वसामान्य लोकांच्या डोळ्यात चांगलंच अंजन घातलंय. अंधाचा हा आगळावेगळी कार्यक्रम आज पंचक्रोशीत चर्चेचा विषय झालाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.