परदेशी पाहुण्यांचं गोंदियात पुनरागमन

गोंदिया - गोंदियातील नवेगाव बांध तलाव स्थलांतरित पक्ष्यांचं माहेरघर म्हणून ओळखला जातो. हल्ली या परिसरात परदेशी पाहुण्यांनी येणंच सोडलं होतं. याचं कारण तलावाजवळ वाढलेली बेशरमाची वारेमाप झाडं. शिवाय इथं येणाऱ्या पर्यटकांचीही खपामर्जी झाल्यामुळं वन विभागही त्रस्त होता. परंतु राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत झालेल्या शिबिरात नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून या पक्ष्यांना परत फिरा रे...ची साद घातलीय. त्यामुळं आज हा परिसर पुन्हा एकदा या पक्ष्यांच्या गुंजारवानं भारून गेलाय.
   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.