टेंभापुरी धरणग्रस्तांचा न्यायासाठी एल्गार"तुमचं धरण, आमचं मरण" अशा घोषणा देत हजारो धरणग्रस्त महिला आणि पुरुष औरंगाबादच्या वाळूजजवळ असलेल्या टेंभापुरी धरणाच्या पायथ्याशी जमले आहेत. आमच्या मागण्या मान्य करा, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, यासारख्या घोषणांनी धरणाचा परिसर दुमदुमून गेलाय. मात्र, गेली ३५ वर्षापासूनचा हा आवाज सरकारपर्यंत पोहोचलेला दिसत नाही... त्यामुळं जोपर्यंत काही ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत धरणाच्या पायथ्याशी ठिय्या मांडून बसण्याचा निर्धार धरणग्रस्तांनी केलाय. Tags |
||
Comments
|