कोकणच्या शेतीला शेततळ्याचं वरदान!

दापोली - सर्वाधिक पर्जन्यमान असलेल्या कोकणात फक्त पावसाळ्यातच शेती होते. तीही विशेषतः भाताची. पावसाचं सर्व पाणी वाहून जात असल्यानं रब्बी हंगामाची पिकं शेतकऱ्यांना घेता येत नाहीत. यावर शेततळ्यांचा पर्याय उत्तम असून तो कोकणासाठी वरदायी ठरू शकतो, असं दापोली कृषी विद्यापीठातील जलतज्ज्ञांनी सिद्ध केलंय. अस्तरीत शेततळी उभारल्यास उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध होतं. त्यामुळं फळबागा तसंच भाजीपाला यांनाही ही शेततळी उपयुक्त ठरणार आहेत.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.