'पळस फुलला रानात'

'पळसाला पानं तीन' अशी नागरी जीवनात पळस या झाडाची ओळख. हिंदीत पलाश, संस्कृतमध्ये त्रिपत्रक,  मराठीत पळस तसंच अग्निशिखा, इंग्रजीत 'फ्लेम ऑफ फॉरेस्ट',  लॅटिनमध्ये ब्युटिया मोनोस्पर्मा ही याची वेगवेगळ्या प्रांतातली नावं.  


महाराष्ट्रात पळसाचा आणि शेतकऱ्याचा फार जवळचा संबंध आहे. शेतावर झोपडी शाकारण्यासाठी, दोरखंडासाठी पळसाच्या सालीचा उपयोग केला जातो. तसंच लग्नाच्या पंगतीतल्या पत्रावळी, तर पोळ्याच्या पूर्वसंध्येला पळसाच्या पानांनीच बैलांचा खांदा शेकला जातो. पळसाची गर्द केशरी फुलं आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. या केशरी फुलांचा उपयोग रंग बनवण्यासाठीही केला जातो. आजही मेळघाटातील आदिवासी लोक होळीमधील रंगांसाठी या फुलांचाच वापर करतात. ही फुलं उमललीत की उन्हाळ्याची चाहूल लागते. तर माळरानही सजलेलं असतं ते केवळ याच अग्निशिखांनी...

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.