मिलिंद शिंदे, अभिनेता

अहमदनगर - कलाकारही समाजासाठी एक देणं लागतो. आपण एक समाजाचा भाग आहोत याची जाणीव ठेवून प्रत्येक  कलाकारानं काही सामाजिक उपक्रम केले पाहिजेत. प्रत्येकानं वाचन वाढवलं पाहिजे, शिक्षणाची कास धरली पाहिजे. आपण एक भारतीय म्हणून समाजाचे, देशाचे नियम काटेकोरपणं पाळण्यासाठी आपली मानसिक तयारी केली पाहिजे. ते तंतोतंत पाळले पाहिजेत, तेव्हाच आपण स्वतःला खरे भारतीय आणि इंडियन म्हणू शकतो. वेदना आणि समस्या हा उत्सव नसतो. ती जाणवली पाहिजे. तिच्यासाठी पेटून उठलं पाहिजे. कलेच्या  माध्यमातून समाज घडवण्यासाठी कलाकारांनी यासाठी मोलाचं योगदान दिलं पाहिजे , असं मत व्यक्त केलंय कवी, अभिनेते मिलिंद शिंदे यांनी . ते अहमदनगर इथं 'स्नेहालय' या सामाजिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते.   

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.