हरीष सदानी, मावा संस्था

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात लढायला महिला सक्षमीकरण हा एकच प्रभावी मार्ग असल्याचं मानलं जातंय. त्यामुळं कित्येक स्वयंसेवी संस्था महिला सबलीकरणावरच भर देताना दिसतात. पण 'मावा' (MEN AGAINST VOILENCE AND ABUSE) ही संस्था काहीसा आगळावेगळा प्रयत्न करतेय. तो म्हणजे 'हिंसा आणि अत्याचारांविरुद्ध पुरुष' या आपल्या नावाप्रमाणंच महिलांवर होणाऱ्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पुरुषांचं मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न ही संस्था करतेय. ही संस्था महिलांवरच्या अत्याचाराविरुद्ध काम करतेय खरी, पण त्यासाठी त्यांनी सोबत घेतलंय, पुरुषांना! 20 वर्षांपूर्वी हरीष सदानी यांनी या संस्थेची स्थापना केली.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.