क्रांतिज्योती प्रकल्पातून महिला सक्षमीकरण

फुले, शाहू, आंबेडकरांची वैचारिक परंपरा लाभलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात सध्या महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आलाय. महिलांना स्थानिक स्वराज संस्थेत 50 टक्के आरक्षण लागू झाल्यानं महिला निवडून येतात खऱ्या. परंतु, सत्तेची सूत्रं खऱ्या अर्थान त्यांच्या हाती येत नाहीत. त्यांच्या आडून नवरा, भाऊ, सासरे, अशी नातलग पुरुषमंडळीचं कारभार हाकताना दिसतात. हे चित्र बदलण्यासाठी महिलांना कामकाजात सक्षम करणं गरजेच काळाची गरज झालीय. त्यादृष्टीनं राज्यात क्रांतिज्योती प्रकल्प सुरु झालाय. निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी त्यासाठी पुढाकार घेतलाय.

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.