नवी मुंबईत वारकऱ्यांचा मेळा

नेरूळ - आम्हां घरी धन शब्दांचीच रत्ने!शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू!!संत तुकोबांच्या या ओव्या म्हणजे शब्दांचं महत्त्व सांगतात. ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, सावता माळी या थोर संतांची परंपरा आपल्याला लाभलीय. याच संतांचे शब्द प्रमाण मानून, संत साहित्याला नवी उभारी देण्यासाठी वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आज नवी मुंबईत थाटात सुरुवात झाली. कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन झालं असून आता तीन दिवस साहित्य रसिकांना वारकरी साहित्याचा आस्वाद घेता येणार आहे.

Tags

   

Comments

  • No comments found

Leave your comments

0
Use 'Ctrl+G' to toggle commenting language from Marathi to English and vice versa.