कोकणातही रुजतात शेतीपूरक व्यवसायरत्नागिरी - कोकणातील आंबा, काजू, नारळ आणि पोफळीच्या बागेत ससा, देशी कोंबड्या आणि शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय कुडावळेतील दीपक देसाई यांनी. तसं पाहिलं तर हे शेतीपूरक व्यवसाय. पण देसाईंनी हे व्यवसाय मुख्य करून त्याला शेती ही जोडधंदा म्हणून केलीय. त्यांच्या ग्रामलक्ष्मी फार्मला शेतकरी आणि पर्यटकही मोठ्या संख्येनं भेट देतायत. प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रातील बागायती पट्ट्यांमध्ये दिसणारे हे शेतीपूरक व्यवसाय कोकणातील बागांमध्येही रुजू शकतात हेच यावरून स्पष्ट झालंय. Tags |
||
Comments
|